मुलींनो...! एमएससीआयटी प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी अर्ज करा महिला व बालकल्याण विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
मुलींनो...! एमएससीआयटी प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी अर्ज करा
महिला व बालकल्याण विभागाचे आवाहन
वाशिम, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत वर्ग ७ ते १२ वी पर्यंतच्या मुलींकरिता मोफत एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र मुलींना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी सदर योजनेअंतर्गत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात व
आवश्यक कागदपत्रासह दि.२७ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत.असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी
महिला व बाल विकास विभाग जि. प. वाशिम यांनी कळविले आहे.
0 Response to "मुलींनो...! एमएससीआयटी प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी अर्ज करा महिला व बालकल्याण विभागाचे आवाहन"
Post a Comment