-->

२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत  विकसित भारत संकल्प यात्रा

२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा



 साप्ताहिक सागर आदित्य 

२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत

विकसित भारत संकल्प यात्रा


वाशिम  केंद्र सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यादृष्टीने केंद्र शासनाने राज्य सरकारच्या सहकार्याने एप्रिल- मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारित स्वरूपात ग्रामस्वराज अभियान राबविले. अद्यापही ज्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ' विकसित भारत संकल्प यात्रा " ही देशव्यापी मोहीम १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

                केंद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे, योजनांच्या माहितीचा प्रसार करून योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक कथा/ अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे आणि या संकल्प यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे.

              " विकसित भारत संकल्प यात्रेचे " ठळक वैशिष्ट्ये म्हणजे जनजाती गौरव दिनाच्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे.

0 Response to "२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article