
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप अध्यात्मिक समन्वय आघाडीचा पुढाकार
साप्ताहिक सागर आदित्य
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
अध्यात्मिक समन्वय आघाडीचा पुढाकार
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधुन 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था वांगी येथील विद्यार्थ्यांना अध्यात्मिक समन्वया आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने शिवशंकर भोयर यांच्या कडुन गणवेशाचे वाटप वाशिम विधानसभा मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान सुद्धा आमदार मलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहन चौधरी चरण गोटे ज्येष्ठ वारकरी केशव महाराज रतन महाराज आढाव विश्वनाथ झाटे, गजानन महाराज शिंदे, गजानन महाराज भोयर किसन झाटे नितेश मलिक मुकेश ठाकुर देवानंद बांगर रामा ठेंगडे निलेश जैस्वाल, रोहित मलिक संतोष बडगे नागेश मलिक राम लांडगे याची उपस्थिती होती.
0 Response to "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप अध्यात्मिक समन्वय आघाडीचा पुढाकार"
Post a Comment