-->

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?


साप्ताहिक सागर आदित्य/

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?… उपमुख्यमंत्री पवार यांचे मोठे वक्तव्य

मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत देखील माहिती दिली. राज्यात मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी म्हटले. ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस देण्यात येत असून, बुस्टर डोस घेण्यासाठी पहिल्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर ठेवावे असे यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.परीक्षेसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात. तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.नियमावलीमध्ये बदल होणार नाही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या कोरोना वाढत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढू शकतो. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने जी नियमावली जाहीर केली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे पवार यांनी म्हटले. जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.

0 Response to "दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन?"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article