अखेर बेपत्ता असलेल्या तरुणांचा मृतदेह आढळला
साप्ताहिक सागर आदित्य/
अखेर बेपत्ता असलेल्या तरुणांचा मृतदेह आढळला
शिरपूर दि.16 जाने - येथील मुरलीधर ऊर्फ चेतन धीरजकुमार मुंदडा वय 22 वर्षे हा तरुण 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता पासून बेपत्ता झाला होता . 16 जानेवारी च्या सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह एका विहिरीमध्ये तरंगतांना आढळून आला असून मृतकाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर खोल जखमा आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून घातपात की दुर्घटना ? अशी शंका कुशंकाना उधाण आले असून पुढील तपास शिरपूर जैन पोलीसांनी सुरु केला आहे. प्राप्त माहितीनुसार शिरपूर येथील मुरलीधर ऊर्फ चेतन धीरजकुमार मुंदडा वय 22 वर्ष व त्याचा मित्र श्रीकांत महादेव गोरे वय 21 वर्ष हे दोघेही तरुण मित्र एम एच 37 सी 9781 या दुचाकीवरुन 14 जानेवारी रोजी घरुन निघून गेले होते . दोन्ही मुले घरी परत न आल्यामुळे दोघांच्याही पालकांनी मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला . मात्र मुलांचा कुठे शोध लागला नाही .शेवटी 16 जानेवारी रोजी येथील महादेव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये चेतन मुंदडाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला . सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते . पोलिसांनी सदर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . सदर तरुणाचा घातपात झाला की हे पोलिसांच्या चौकशीनंतरच समोर येईल. मृतकाचे काका कचरुलाल मुंदडा यांनी फिर्यादी नुसार श्रीकांत महादेव गोरे वय 21 वर्ष यांच्यावर फिर्यादी ने दिलेल्या तक्रारीवरून भा.द वी. 364 , 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर करीत आहेत.
0 Response to "अखेर बेपत्ता असलेल्या तरुणांचा मृतदेह आढळला "
Post a Comment