-->

जिल्हयातील १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन केले हददपार

जिल्हयातील १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन केले हददपार

 


साप्ताहिक सागर आदित्य/

जिल्हयातील १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन केले हददपार गुन्हेगारी समुळ ऊच्चाटन करण्याचा पोलिस अधिक्षक यांनी बांधला चंग

वाशिम - पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले व ते यशस्वीपणे पुर्ण सुध्दा केले आहेत. वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी समुळ उच्चाटन करण्याचा त्यांनी चंग बांधला असुन दरोडा, जबरी चोरी करणारे शरीराविरुदध गुन्हे करणारे तसेच सार्वजनिक शातंतेस बाधा आणणे,जनमानसात जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बऱ्याच आरोपीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे.पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हयाचा कार्यभार हाती घेतल्यापासुन तब्बल १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन हददपार केले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे.अनसिंग पोलीस ठाणे येथील आरोपी नामे १)श्याम मधुकर शिंदे ,२)श्याम अशोक गव्हाणे,३)अजय ४)विजय गव्हाणे,५)शुभम अंकुश सोनावणे,६) गणेश अशोक राऊत ७) गणेश गजानन अमरावतकर ८)अक्षय गजानन अमरावतकर सर्व रा.अनसिंग यांचेवर अनसिंग पोलीस ठाणे अपक्र ०६/१९ कलम ३०२ भादवी अन्वये खुना सारखा गंभीर गुन्हा दाखल असुन त्या गुन्हयात मा. न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मालेगाव पोलीस ठाणे येथील अटक आरोपी १)गोपिनाथ शिवाजी नागरे रा. ब्राम्हणवाडा मालेगाव हयांचेवर मालेगाव पोलीस ठाणे येथे शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द अपक्र ६८/१४ कलम ३२४,१४३,१४७,१४८,१४९,५०६ भादवी ३७२/२०,४०८/२०,०६/२१,२८९/१९ २४९/२०,१८१ / २१ भादवी गुन्हे दाखल आहे. आरोपी नामे १)हरिष गोवर्धन सारडा रा वाशिम यांचे वाशिम जिल्हयात वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्द,गैरकायदयाची मंडळी जमवुन सार्वजनिक शातंतेस बाधा आणणे,जनमानसात जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे.वर नमुद प्रमाणे पोलीस ठाणे मार्फत त्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजेच वाशिम,मंगरुळपीर यांचे मार्फत पोलीस अधिक्षक कार्यालय येथे तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन पोलीस अधिक्षक वाशिम यांनी उपविभागीय दंडाधिकारी वाशिम यांना नमुद प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता सादर करण्यात आले होते.उपविभागीय दंडाधिकारी वाशिम प्रकाश राऊत यांचे वर नमुद १० सराईत गुन्हेगारांवर आदेशान्वये १ वर्षाकरीता तडीपार आदेश पारीत करण्यात आले. पोलीस अधिक्षक वाशिम बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात,अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे,उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम,मंगरुळपीर सुनिल कुमार पुजारी, यशवंत केडगे,पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव,ठाणेदार मालेगाव पो.नि किरण वानखडे,ठाणेदार वाशिम ग्रामीण विनोद झळके,ठाणेदार अनसिग श्रीमती नैना पोहेकर,स्थागुशा येथील पोहेकॉ किशोर चिंचोळकर,पोना प्रविण राऊत तसेच उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथील लिपिक श्रीराम घुगे यांनी सहभाग नोंदविला.मा. पोलीस अधिक्षक यांनी वाशिम मधील सराईत गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविण्यासाठी सुरु केलेले कारवाई सत्र असेच सुरु राहणार असुन अजुन बरेच सराईत आरोपी पोलीसांच्या रडावर आहेत. यांची करीता हा सावधानतेचा इशारा असल्याचे हया कारवायावरुन दिसुन आले.




0 Response to "जिल्हयातील १० सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन केले हददपार "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article