
मुख्याधिकारी नप वाशिम यांना निवेदन गुंठेवारी नियमित करण्याकरता अर्ज सादर करून एक वर्ष पूर्ण झाले
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्याधिकारी नप वाशिम यांना निवेदन
गुंठेवारी नियमित करण्याकरता अर्ज सादर करून एक वर्ष पूर्ण झाले असून आजपर्यंत एकही भूखंड नियमित केलेले नाहीत.
वरील विषयास अनुसरून भूखंड नियमित करण्याकरिता शहरातील हजारो गोरगरीब भूखंड धारकांनी पैसे खर्च करून आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर केले आहेत याला एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा एका ही भूखंड धारकांचे भूखंड नियमित केलेले नाही असे दिसून येत आहे.
नगर परिषद वाशिम ही शहरातील धनाड्य नवीन लेआउट व्यवसायिक साठी काम धडल्याने सुरु आहे.
तरी गोरगरिबाचे वर्षानुवर्ष भूखंड नियमित करण्याकरिता दिलेले अर्ज धुळकात पडलेले दिसत आहेत तरी आपण लवकरात लवकर संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेल्या भूखंड धारकांचे भूखंड एक महिन्याच्या आत नियमित करून द्यावेत ही विनंती... अन्यथा आम आदमी पार्टी कडून भूखंड धारकांना घेऊन नगर परिषद वाशिम येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी आपली असेल...
राम पाटील डोरले, नागसेन सुरवाडे
आप वाशिम
0 Response to "मुख्याधिकारी नप वाशिम यांना निवेदन गुंठेवारी नियमित करण्याकरता अर्ज सादर करून एक वर्ष पूर्ण झाले"
Post a Comment