
वाशिम येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात वंचित बहुजन आघाडी वाशिम ची आढावा बैठक संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात वंचित बहुजन आघाडी वाशिम ची आढावा बैठक संपन्न.
वाशिम: जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हा महिला आघाडी, वाशिम, मंगरुळपिर, कारंजा, मालेगाव शहर कार्यकारणी, तसेच वाशिम जिल्हा युवा कार्यकारणी सत्कार व जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी डॉ गजाला खान, प्रदेश सदस्या महिला आघाडी किरणताई गिर्हे, वंचित बहुजन आघाडी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, फुले शाहु आंबेडकर विद्वत सभेचे पश्चिम विदर्भ समन्वयक प्राचार्य डॉ विठ्ठल खाडे, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतिताई इंगळे, महिला आघाडी जिल्हा महासचिव सौ सुशीलाताई खाडे,सचिव किरण खडसे सहसचिव रुपाली भगत सदस्य सुषमा भगत, सदस्य शोभाताई इंगोले जिल्हा महासचिव युवा आघाडी सौरभ सपकाळ, समाजकल्याण सभापती वणीताताई देवरे, जि प सदस्या कल्पनाताई राऊत, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन वाशिम तालुका महासचिव संजय पडघन यांनी केले असून प्रास्ताविक सोनाजी इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाशिम शहर अध्यक्ष सागर इंगळे यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हा महिला आघाडीचा, नवनियुक्त वाशिम शहर कमिटी, मंगरुळपिर शहर कमिटी, मालेगाव शहर कमिटी, कारंजा शहर कमिटी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार व आढावा बैठकीच्या कार्यक्रमाला डॉ गजाला खान, किरणताई गिर्हे, डॉ सिद्धार्थ देवळे, डॉ गजानन हुले, सोनाजी इंगळे, सिद्धार्थ देवरे, ज्योतीताई इंगळे, यांनी मार्गदर्शन केले तर सारनाथ अवचार, महेश तिडके, विनोद राठोड, रमेश राठोड, नारायण खोडके, रवींद्र भुसारी, यांनी आपले तालुका संघटन कामाबद्दल आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमात वैष्णवी मानकर या विद्यार्थ्यांनीचा तलवार बाजीमध्ये विदर्भावर गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. तालुका आढावा बैठकीत वाशिम, मालेगाव, मंगरुळपिर आणि मानोरा तालुक्यातील सर्कल कमिटीचे काम पूर्ण करण्यासाठी तालुका अध्यक्ष/ महासचिव तथा तालुका कार्यकारणी यांना सूचना करण्यात आल्या तर रिसोड कारंजा तालुक्यातील सर्व सर्कल कमिटी केल्याबद्दल तालुका अध्यक्ष, महासचिव व सर्व तालुका कमिटीचे अभिनंदन करून येत्या दोन महिन्याच्या कालावधीत गाव तेथे शाखा स्थापन करून / पुनर्जीवित करून गावागावात वंचित बहुजन आघाडी शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी काम करावे अश्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात होऊ घातलेल्या वाशिम, मंगरुळपिर, कारंजा न प च्या निवडणूक संदर्भात वार्ड शाखा, पुनर्जीवित करून पदाधिकारी व कार्यकते यांनी कामाला लागावे असल्या सूचना आढावा बैठकीच्या माध्यमातुन देण्यात आल्या. लवकरच प्रदेश अध्यक्ष मा रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात येणार असल्यामुळे त्याची तयारी आतापसून करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. कार्यक्रमाला वाशिम जिल्हा कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सावध, गजानन इंगोले, अब्दुल जावेद अब्दुल राज्जाक, जिल्हा सचिव उत्तमराव झगडे, दिलीप भगत, वसंतराव हिवराळे, गजानन माळेकर, रवी चंद्रशेखर, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत जांभरूनकर, विधी सल्लागार ऍड हिरामण मोरे, मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, वाशिम तालुका अध्यक्ष नारायण खोडके, मंगरुळपिर ता अध्यक्ष रमेश अवचार, ता महासचिव गौतम खाडे, मानोरा तालुका अध्यक्ष विनोद राठोड, ता महासचिव नंदुभाऊ वानखेडे, कारंजा ता महासचिव रवींद्र भुसारी, रिसोड तालुका महासचिव महेश तिडके, महिला जिल्हा आघाडी महासचिव प्रतिभाताई अंभोरे, सुशीलाताई खाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभाताई मडामे, संघटक सीमाताई खंडारे,संगीताताई आठवले, जिल्हा सचिव किरणताई राऊत, सीमाताई जगताप, साधनाताई सोरते, किरणताई खडसे,सुषमाताई भगत, शोभाताई इंगोले, रुपालीताई भगत, माजी जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, वाशिम शहर अध्यक्ष, मंगरुळपिर शहर अध्यक्ष शेख अबरार, डॉ शेख जावेद, संजय गायकवाड, रामदास वानखेडे, गजानन गव्हांदे, केशव गायकवाड, जगदीश दंदे, अनिल अंभोरे, गोपाल सावळे, केशव अंभोरे, कैलास ढाले, राहुल कांबळे, राजरत्न पंडित, निखिल धाडवे, श्रीकृष्ण राठोड, विनोद नागरे, गजानन दाहात्रे, रुपेश राऊत, उमेश राऊत, सुमेध भगत, भारत भगत, देवानंद कांबळे, नितीन डोंगरदिवे, उत्तम पवार, विनोद तान्हाजी भगत, समाधान भगत, गोपाल सुर्वे, प्रमोद इंगोले, मचिंद्र मोहळे, वैष्णवी मानकर, समाधान मानकर, ऍड एम. ए. खान, आरिफ खान, मोंक बुद्धभूषण, यांचेसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात वाशिम येथील जवळपास 25 मुस्लिम युवकांनी वंचीत बहुजन आघाडीत प्रवेश घेतला।
0 Response to "वाशिम येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात वंचित बहुजन आघाडी वाशिम ची आढावा बैठक संपन्न."
Post a Comment