
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा :संदीपभाऊ बोडखे
साप्ताहिक सागर आदित्य
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा :संदीपभाऊ बोडखे 31जुलै पीक विमा काढण्याची अंतिम तारीख सन 2023 खरीप हगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना काढता यावा या साठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक रुपये मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा लागू केला आहे त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुवा मोर्चा ता उपाध्यक्ष संदिपभाऊ बोडखे यांनी केले आहे शेतातील पिकांना नैसर्गिक आपत्तीत सुरक्षा संरक्षक कवच म्हणून शासनाच्या वतीने पिक विमा योजना अमलात आणली आहे तर एक रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा काढता येणार आहे तर याबाबत पिक विमा काढण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे शेतकऱ्याचे पिकाची नैसर्गिक पिक विमा चा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो तर कर्जदार बिगर कर्जदार या शेतकऱ्यांना लाभ घेता येतो जर नैसर्गिक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत म्हणून पिक विमा मिळतो योजना अतिशय चांगली आहे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांनी आपला पिक विमा जास्तीत जास्त भरावा व लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीपभाऊ बोडखे यांनी केले आहे
0 Response to "प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा :संदीपभाऊ बोडखे "
Post a Comment