
कै. अभय कुमार झबुलाल नांदगावकर यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
कै. अभय कुमार झबुलाल नांदगावकर यांचे मरणोत्तर नेत्रदान
वाशिम येथील संजीव कुमार नांदगावकर यांचे वडील स्वर्गीय अभय कुमार जबलाल नांदगावकर यांच्या वयाच्या 91 व्या वर्षी दिनांक 27.10.2023 रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे तसेच संपूर्ण नांदगावकर कुटुंबातील आधारस्तंभ तथा सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै अभय कुमार झबुलाल नांदगावकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण नांदगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना नांदगावकर कुटुंबीयांनी एवढ्या दुःखामध्ये ही मृत्यूनंतर नेत्रदान करून दोन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा डॉ. हरीश बाहेती यांच्याकडे व्यक्त केले त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खेळकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. बेदरकर, डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व. अभय कुमार झबुलाल नांदगावकर यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी गणपती नेत्रालय जालनाकडे पाठविण्यात आली. तरी सदरील इतर दान करण्याकरिता डॉ. सागर आंबेकर व नांदगावकर कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळी सक्रिय सहभाग घेऊन नेत्रदान चळवळ हे लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीची त्वरित नेत्रदान घडून आणावे व नेत्रदानंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असून नांदगावकर कुटुंबाचे आभार मानले.
नेत्रदानासाठी संपर्क क्रमांक ९९२२५१९९४८ जिल्हा रुग्णालय वाशिम
0 Response to "कै. अभय कुमार झबुलाल नांदगावकर यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment