-->

वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा राज्यात सर्वोत्कृष्ट.

वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा राज्यात सर्वोत्कृष्ट.



 साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा राज्यात सर्वोत्कृष्ट.

जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक ठरले नंबर वन.

वाशिम दि. 12 मार्च 2025

आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकानुसार राज्यस्तरावरून करण्यात येणाऱ्या रँकिंगमध्ये वाशिम जिल्हा ग्रामीण आणि शहरी आरोग्य सेवा या दोन्ही आघाड्यावर सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे या दोघांनीही रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.

याबद्दल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकावर आधारित राज्यातील पाच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पाच जिल्हा शिल्लक यांचे दर महिन्याचे रँकिंग जाहीर करण्यात येते.

मागील अनेक महिने वाशिम जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे कधी नंबर एक वर तर कधी टॉप फाईव्ह मध्ये राहिले आहेत. जानेवारी महिन्याच्या रँकिंग नुसार दोन्ही अधिकारी राज्यस्तरावरील रँकिंग मध्ये क्रमांक एकवर आहेत. ही बाब जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आरोग्य सेवा ही दर्जेदार असल्याचे निदर्शक आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील पी एच सी आणि सब सेंटर या दवाखान्यातील ओपीडी मध्ये वाढ होण्यास प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट काम केलेल्या डॉक्टर आणि नर्स चे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये फलक लावून अभिनंदन करणे, ग्रामीण भागातील महिलांची डिलिव्हरी ही शासकीय रुग्णालयातच व्हावी यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबींचा समावेश होता. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेमुळे जिल्ह्याचे नावलौकिक झाले असुन त्याचे श्रेय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्यासह संपुर्ण आयोग्य यंत्रणेला आहे. त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदर होत आहे.

Related Posts

0 Response to "वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा राज्यात सर्वोत्कृष्ट."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article