-->

" निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान   18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी

" निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान 18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर

" निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान 

18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी 


वाशिम  " निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " या अभियानातुन 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे.या आरोग्य अभियानात जास्तीत जास्त पुरुषांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले आहे.

             या अभियानात जिल्ह्यातील 18 वर्ष व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक करावयाच्या चाचण्या व उपचार मोफत मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.   

           जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका तसेच आरोग्य सेवकांनी गृहभेटीदरम्यान जनजागृती व उपलब्ध सुविधाबाबत माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे. 

            आरोग्यवर्धनी केंद्र,उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांचेमार्फत आरोग्य मेळाव्यातून पुरुषांची तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे.यामध्ये रक्तदाब, मधुमेह,मुखाचा कर्करोग,मोतीबिंदू, क्षयरोग व इतर 64 प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे.त्यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायतीत तपासणी शिबिरे घेण्यात येतील.

              आजारी पुरुषांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात सर्व आरोग्यवर्धनी उपकेंद्र ,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात या अभियानाच्या कालावधीत 18 वर्षावरील पुरुषांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. यामध्ये 30 वर्षावरील पुरुषांचे आरोग्यविषयी समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची सर्वांगीण तपासणी करून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे यांनी दिली. 

         या अभियानातर्गत जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व पुरुषांच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक चाचण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहे.जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.गरजेनुसार गंभीर आजारी रुग्णांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी दिली आहे.

Related Posts

0 Response to "" निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान 18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article