-->

राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान  मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण  उमेदवारांकडून अर्ज मागविले

राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान

मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण

उमेदवारांकडून अर्ज मागविले

       वाशिम,  : दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, नगर परिषद, वाशिमअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी, संबंधित कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगार वैयक्तिक व्यवसायासाठी बँकेमार्फत अर्थसहाय्याचा लाभ वाशिम शहरातील उमेदवारांना देण्यात येणार आहे.


          वाशिम येथील श्री. गणेशा टेक्नॉलाजी, जाधव ले-आऊट, लाखाळा, वाशिम येथे 60 क्षमतेच्या अकाऊंट एक्झीकिटिव्ह कोर्ससाठी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा असून शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास निश्चित केली आहे. याच प्रशिक्षण संस्थेत एलईडी लाईट रिपेअर टेक्निशियन प्रशिक्षणाकरीता 60 उमेदवारांची प्रशिक्षण क्षमता असून या प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने आहे. उमेदवार हा इ. 12 वी पास असावा. श्री तुळशीराम जाधव आर्ट आणि सायन्स कॉलेज, वाशिम येथे डेरी प्रोडक्ट प्रोसीजर याकरीता 60 प्रशिक्षणार्थ्यांची क्षमता असून प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने आहे. तर प्रशिक्षणार्थी हा इ. 12 वी उत्तीर्ण असावा.


           या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्व्हेक्षण यादीतील लाभार्थी असावा किंवा सुवर्ण जयंती शहरी योजनेतील लाभार्थी असावा. तसेच अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, स्त्रीया, अल्पसंख्यांक व दिव्यांग यांना हे प्रशिक्षण घेता येईल. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 45 असावी. लाभार्थी हा वाशिम नगर पालिका हद्दीतील रहिवासी असावा. अर्जासोबत उमेदवाराने आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, जातनिहाय यादीतील क्रमांक/ सुवर्ण जयंती शहरी योजना यादीतील लाभार्थी, दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे घेवून संबंधित कार्यालयामध्ये प्रशिक्षणासाठी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी शहर उपजिवीका केंद्र, बालाजी संकुल, युनियन बँकजवळ, वाशिम तसेच नगर परिषद, वाशिम येथे संपर्क करुन आपला अर्ज भरुन प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन वाशिम नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी केले आहे.  



Related Posts

0 Response to "राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article