
सभापती मधुकर मामा काळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,घाटा येथे भेट....
साप्ताहिक सागर आदित्य
पती मधुकर मामा काळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,घाटा येथे भेट....
मालेगांव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती मधुकर मामा काळे यांनी नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे अचानक भेट दिली.
यावेळी सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांनी वर्गाला भेट दिली असता शिक्षक विद्यार्थी आपापल्या वर्गात कामात गुंग होते.सर्व विद्यार्थी शालेय गणवेशात असल्याचे पाहून त्यांनी कौतुक केले.विद्यार्थी प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक लगबग..धावपळ पाहून... साहेब म्हणाले"अहो सर.....बसा....मी काही मोठा माणूस नाही...तुमची शाळा तपासायला पण आलो नाही......तुमच्या सर्वांच्या भेटीला आलो....*मी सभापती नाही..तुमचा मामा आहे* अस म्हणून कौटुंबिक वातावरण तयार केलं...शाळेच्या प्रगतिविषयी आणि भौतिक सुविधा विषयी चर्चा सुरू केली...वर्ग ८ असून खोल्या चारच आहेत अस कळल्यानंतर लगेच एक खोली देण्याचे मान्य केले.नळाचे टाकीमधील पाणी मुले पितात असे समजताच त्यांनी मुलांना फिल्टरचे मिळाले पाहिजे यासाठी फिल्टरची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले....यावेळी त्यांनी खिचडीचा स्वाद घेतला...आपण प्रत्येक शाळेत खिचडी घेतो...आपली खिचडी मला आवडली असे त्यांनी मावशीला आवर्जून सांगितले...स्वच्छ व सुंदर परिसर पाहून आनंद झाला असेही म्हणाले.
खरच.....अधिकारी असो किंवा पदाधिकारी असो.....शाळा भेट म्हणजे आपला अधिकार दाखविण्यासाठी असते .....चार चौघा देखत फक्त चुकावर बोट ठेऊन शिक्षकांना धारेवर धरायचे...पण मामा अपवाद ठरले..
असे पदाधिकारी असले तर विकास व्हायला वेळ लागणार नाही...
नंतर गावात गेल्यावर सरपंच प्रकाश पाटील यांना सोबत घेऊन खोलीच्या जागेची पाहणी सुद्धा केली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर सर,शाळेतील शिक्षक तुकाराम इंगळे सर,विठ्ठल कालवे सर,संमती पंचवाटकर सर उपस्थित होते.
0 Response to "सभापती मधुकर मामा काळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,घाटा येथे भेट...."
Post a Comment