
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे शाळा पूर्व तयारी पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न...
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे शाळा पूर्व तयारी पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न...
'पहिले पाऊल' शाळा पूर्वतयारी अभियानंतर्गत शाळा स्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे शाळा पूर्व तयारी पालक विद्यार्थी मेळावा २८ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला.
शासनाच्या स्टार्स प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पहिलीच्या दाखल पात्र बालकासाठी 'पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी अभियान' विशेषरित्या राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याकरिता बालकांची शाळा प्रवेशापूर्वीची विशेष तयारी पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून विशेष अभियान राबविल्या जात आहे. याबाबत राज्यस्तरावरील प्रशिक्षणानंतर जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर संबंधित साधन व्यक्तींची व शिक्षकांची प्रशिक्षणे पार पडली असून २८ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी शाळा पूर्वतयारी अभियान पहिले पाऊल म्हणून राबविले गेले.
इयत्ता पहिलीसाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शाळा पूर्वतयारीच्या माध्यमातून वाजत गाजत शाळेत आणले.प्रभात फेरी काढण्यात आली. शाळा स्तरावर सुंदर सजावट करण्यात आली.विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्याच्या पावलाचे ठसे उमटवून वर्गात प्रवेश केला. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्रकाश पाटील हे होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सर्व पाहुण्याचे आणि बालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांनी प्रास्ताविकातून शाळा पूर्व तयारी पालक मेळाव्याचा उद्देश सांगितला.कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन तुकाराम इंगळे सर यांनी केले.यावेळी एकूण सात स्टॉल लावण्यात आली होती.पहिल्या स्टॉल वर नोंदणी करून वजन ,उंची घेण्यात आली.दुसऱ्या स्टॉल वर विविध खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास पाहिला ,तिसऱ्या स्टॉल वर विविध कृतीमधून बौद्धिक विकासाचा अंदाज घेण्यात आला.चौथ्या स्टॉल वर सामाजिक व भावनिक विकास झाला की नाही हे पाहण्यात आले.पाचव्या स्टॉल वर भाषा विकास तर सहाव्या स्टॉल वर गणन पूर्व तयारी तपासण्यात आली.सातव्या स्टॉलवर पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्याशिवाय माता पालकांचे वेगवेगळे गट बनविल्याने प्रत्येक मातेला आपल्या पाल्याकडे लक्ष देणे सोयीचे होणार आहे. विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी वाया न जाता माता पालकाजवळ बसून इयत्ता पहिलीच्या प्राथमिक कृती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांच्याकडून करवून घेतल्या जाणार आहेत.
प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके व विकास कार्ड दिले गेले त्यानुसार माता पालकांनी वेगवेगळे गट बनवून त्यानुसार इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांची उन्हाळ्यातील दोन महिने पूर्वतयारी करून घेतील. यावेळी शाळायावेळी प्रवेश पात्र विद्यार्थी,त्यांचे आई वडील, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायतचे पदाधिकारी,गावातील नागरिक,सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर सर,शिक्षक तुकाराम इंगळे सर,विठ्ठल कालवे सर,संमती पंचवाटकर सर,अंगणवाडी सेविका शारदा इंगळे,मदतनीस रंजना दाभाडे,वंदना शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे शाळा पूर्व तयारी पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न..."
Post a Comment