यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान
साप्ताहिक सागर आदित्य
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक
सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान
वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधान सभा मतदार संघात 52.74 टक्के मतदान
यवतमाळ/वाशिम, : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज जिल्हाभर मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. सायंकाळी 5 वाजता पर्यंत एकून 54.04 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक प्रमाणात मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकून 19 लाख 40 हजार 916 इतके मतदार आहे. त्यात पुरुष 10 लाख 2 हजार 400, महिला 9 लाख 38 हजार 452 तर इतर 64 मतदारांचा समावेश आहे. आज मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजतापर्यंत 10 लाख 48 हजार 857 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदार 5 लाख 59 हजार 248, महिला मतदार 4 लाख 89 हजार 588 तर इतर 21 मतदारांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत वाशिम आणि कारंजा हे दोन मतदारसंघ आहेत तसेच 06 अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकूण 9 लाख 79 हजार 237 मतदारांपैकी 5 लाख 10 हजार 814 पुरुष, 4 लाख 68 हजार 407 महिला आणि 16 इतर मतदार आहेत. यापैकी दोन लाख 78 हजार 323 पुरुष व 2 लाख 38 हजार 121 महिला आणि इतर 10 असे एकूण पाच लाख 16 हजार 454 मतदारांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 06- अकोला लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा विधानसभा मतदारसंघ याचाही समावेश आहे रिसोड मतदारसंघात एकूण 53. 80 टक्के म्हणजेच एकूण तीन लाख पंधरा हजार 929 मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावलं यामध्ये एक लाख 65 हजार 772 पुरुष तर एक लाख 50 हजार 157 महिलांनी मतदान केले. मतदानाची ही आकडेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आहे
सायंकाळी 5 वाजतापर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघ 1 लाख 91 हजार 864 मतदारांनी मतदान केले असून एकून मतदारांच्या ही टक्केवारी 53.81 टक्के इतकी आहे. कारंजा मतदारसंघात 1 लाख 54 हजार 626 इतके मतदान झाले, मतदानाची टक्केवारी 50.41, राळेगाव मतदारसंघ 1 लाख 72 हजार 992 मतदान तर टक्केवारी 61.50, यवतमाळ मतदारसंघ 1 लाख 76 हजार 752 मतदान तर टक्केवारी 49.46, दिग्रस मतदारसंघ 1 लाख 88 हजार 460 मतदान, टक्केवारी 57.06 तर पुसद विधानसभा मतदारसंघात 1 लाख 64 हजार 163 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी 53.18 टक्के इतकी आहे.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 19 लाख 16 हजार 185 इतके मतदार होते. त्यापैकी 11 लाख 74 हजार 824 मतदारांनी मतदानाचा अधिकारी बजावला होता. मतदानाची ही टक्के 61.31 टक्के इतकी होती. यावर्षी यापेक्षा जास्त मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
0 Response to "यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान"
Post a Comment