-->

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार व नियोक्त्यांनी  ऑनलाईन एम्प्लॉयमेंट कार्ड काढावे

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार व नियोक्त्यांनी ऑनलाईन एम्प्लॉयमेंट कार्ड काढावे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी

सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार व नियोक्त्यांनी

ऑनलाईन एम्प्लॉयमेंट कार्ड काढावे

       वाशिम,  : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार तसेच सर्व प्रकारच्या नियोक्त्यांनी ऑनलाईन एम्पॉयमेंट कार्ड काढून विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. या कार्यालयामार्फत केंद्र शासन पुरस्कृत योजना, राज्य शासन पुरस्कृत योजना, जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना खाजगी क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील नोंदणीकृत संस्थांकडे प्रशिक्षणाकरीता अर्ज करता येतो.


         महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध व्यावसायीक प्रशिक्षण संस्था अधिकृत केल्या आहे. या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते. या संस्थाची नावे, पत्ता व संपर्क क्रमांक उपलब्ध आहे. विविध शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांवर मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी या यंत्रणांकडून नोंदणीकृत उमेदवरांच्या याद्या कौशल्य विकास विभाग, रोजगार व उद्योतकता मार्गदर्शन केंद्र मागविते. यासाठी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण उमेदवार की ज्याचे किमान वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून सेवायोजन कार्ड/ एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांचा डाटा केंद्रस्तरावरील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर लिंक असून उमेदवारांना राष्ट्रीयस्तरावरील उपलब्ध रोजगाराच्या संधीबाबतही माहिती प्राप्त होणार आहे. ज्यादवारे नोंदणीकृत उमेदवारांना नोकरीसाठी मेसेज सुध्दा नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येतो. त्यामुळे रोजगार इच्छुक उमेदवारांना नोकरी/ रोजगार शोधण्यासाठी मदत होते.


          नियोक्ते व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका छताखाली एकत्र आणून रोजगार प्राप्त करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता विनामुल्य नोकरीच्या संधी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याव्दारे दिल्या जाते. बाजारपेठेतील मनुष्यबळाच्या मागणीनुसार विविध आस्थापना/ उद्योजक/नियोक्ते यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विनामुल्य व्यासपीठ https://mahaswayam.gov.in या पोर्टलव्दारे उपलब्ध करुन दिल्या जाते.

         अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील स्वयंरोजगार इच्छुक उमेदवार  https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन घेऊ शकतात. या सर्व योजनांच्या संपूर्ण माहितीकरीता https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन व नोंदणी करुन लाभ घ्यावा. तसेच

या पोर्टलवर नोकरी इच्छुक, स्वयंरोजगार इच्छुक उमेदवार तसेच सर्व प्रकारच्या आस्थापना/ उद्योजक/कंपनी/शासकीय व निमशासकीय कार्यालये/ स्थानिक स्वराज्य संस्था/महामंडळ/दुकानदार/ हॉटेल/मॉल/शॉप इतर सर्व प्रकारचे नियोक्ते नोंदणी करु शकतात. योजनांचा लाभ घेण्याकरीता/नोकरी मिळण्याकरीता प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या  www.mahaswyam.gov.in पोर्टलवर नाव नोंदणी केलेली असेल आणि आपली माहिती अद्ययावत नसेल तर वेबपोर्टलवरील नोंदणी आधारक्रमांकासह इतर माहिती अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन पोर्टलवर असलेल्या सुविधांचा अविरतपणे लाभ घेता येईल. विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर त्वरीत अद्ययावत करावी.


          पूर्वीची नोंदणी अपडेट न करता नवीन नोंदणी केलेली असल्यास नवीन नोंदणी ही कार्यालयाच्या सेवा जेष्ठता यादीमध्ये 07252-231494 या क्रमांकावर करता येईल. त्याकरीता नोंदणी झालेली असेल आणि आपल्याला नोंदणी क्रमांक (युजर आयडी) वा पासवर्डबद्दल काही शंका असल्यास आधार कार्ड तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसह कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा.



Related Posts

0 Response to "विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार व नियोक्त्यांनी ऑनलाईन एम्प्लॉयमेंट कार्ड काढावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article