
रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचा संप प्रलंबित मागण्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
साप्ताहिक सागर आदित्य
रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचा संप प्रलंबित मागण्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वाशीम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सेवक यांच्या रा विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप पुकारला आहे . मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे , मानधन देण्यात यावे , सर्व ग्रामरोजगार सेवक यांचे मासिक मानधन थेट रोजगार सेवक यांच्या खात्यात जमा करणेत यावे , अशा मागण्यांसाठी राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत मागील १० ते १२ वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडित मग्रारोहयोची कामे करत आहोत . सहा . कार्यक्रम अधिकारी , तांत्रिक सहाय्यक , क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर , ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांचा राज्यव्यापी बेमुदत संप te वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडत असून मग्रारोहयोची कामे वेळेवर पूर्ण करत आहोत . त्याचप्रमाणे कोविड १ ९ अशा महामारीच्या काळातसुद्धा आम्ही नियमित कार्यरत राहून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता व आम्हाला कोणत्याही शासकीय सुविधा नसतानासुद्धा मग्रारोहयोअंतर्गत योजनाचे गावामधील प्रत्येक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून देऊन रोजगार दिला . शासनाकडे आमच्या मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने , आंदोलने , चर्चा करूनही मागण्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत . अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आंदोलनमध्ये रोहयो मंत्री यांनी अधिवेशनानंतर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते ; परंतु अद्यापही बैठक आयोजित केलेली नाही . त्यामुळे आमच्या मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी विलंब होत आहे . त्यामुळे आम्ही सर्वजण कामबंद आंदोलनात सहभागी होऊन नरेगाअंतर्गत सर्व कामावर असहकार धोरण करत आहे . सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या सुरू असलेल्या राज्यव्यापी संपास आमचा पाठिंबा देत आहे . या निवेदनाद्वारे आम्ही राज्यातील पुरी करो तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक विनंती करतो की , आमच्या रास्त मागण्यांसाठी सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले .
0 Response to "रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचा संप प्रलंबित मागण्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन"
Post a Comment