
मतमोजणीच्या दिवशी रिसोडचे निवडक वाहतूक मार्ग बंद राहणार
साप्ताहिक सागर आदित्य/
मतमोजणीच्या दिवशी रिसोडचे निवडक वाहतूक मार्ग बंद राहणार
वाशिम : रिसोड येथे २९ डिसेंबर रोजी ४३ ग्रामपंचायतीची मतमोजणी तहसिल कार्यालय रिसोड येथे होणार आहे. मतमोजणीची ही प्रक्रीया शांततेत पार पडावी, रहदारी व लोकांच्या गर्दीवरील नियंत्रणाकरीता वाहतूकीस होणारा अडथळा टाळण्यासाठी २०डिसेंबर रोजी मतमोजणी कालावधी पुरता रिसोड येथील सिव्हील लाईन रोडवरील बस स्टॅन्डमागील साई लॉज ते बस स्टॅन्ड वॉल कंपाऊंडपर्यंत, गीता फर्निचर, महालक्ष्मी मेडीकलपर्यंतचा सिव्हील लाईन मार्ग, पोस्ट ऑफिस चौक, जेएमएफसी कोर्टकडे जाणारा मार्ग, विवेकानंद वाचनालयाच्या बाजूचा रस्ता आणि विश्रामगृह कॉर्नर आदी मार्ग पुर्णपणे बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ख) नुसार अधिकाराचा वापर करुन २० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणीची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत रिसोड येथील वरील मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
0 Response to "मतमोजणीच्या दिवशी रिसोडचे निवडक वाहतूक मार्ग बंद राहणार"
Post a Comment