-->

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक  मतदानासाठी कामगारांना मिळणार सुट्टी

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी कामगारांना मिळणार सुट्टी



साप्ताहिक सागर आदित्य/

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी कामगारांना मिळणार सुट्टी

वाशिम : जिल्हयातील खाजगी आस्थापनेतील दुकाने, इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, कारखाने, चित्रपटगृहे, मॉल्स व रिटेलर्स आदी आस्थापनेतील कामगारांना तसेच ग्रामपंचायतीच्या जवळच्या औद्योगिक क्षेत्रात वसाहती असलेल्या कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हयात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत या कामगारांना मतदान करता यावे व कोणताही कामगार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनेत कार्यरत सर्व कामगारांना ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करण्यासाठी पुर्ण पगारी सुट्टी देऊन त्यांना मतदान करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे. 


Related Posts

0 Response to "ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी कामगारांना मिळणार सुट्टी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article