
श्री पांडुरंग विद्यालयाचे आठ खेळाडू विभागीय स्तरावर पिंपळा ता. मालेगाव
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग विद्यालयाचे आठ खेळाडू विभागीय स्तरावर
पिंपळा ता. मालेगाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ व ९ डिसेंबर २०२२ रोजी वाशिम जिल्हा क्रीडा संकुल च्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये श्री.पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील आठ(०८)मुलांची विभागीय स्तरावर निवड झाली. यामध्ये १४ वर्षे वयोगटात कु. सृष्टी दत्ता जोगदंड -उंच उडी-द्वितीय,१७ वर्षे वयोगटात कु. श्रुतिका लक्ष्मण राऊत १०० मीटर हर्डल्स-प्रथम, कु. सानिया सुनील वानखेडे १०० मीटर हर्डल्स- द्वितीय,कु. शिवानी आश्रू तागड -उंच उडी -प्रथम,रोशन महादेव भगत ,थाळीफेक- द्वितीय ,१९ वर्षे वयोगटात कु. अंजली जनार्दन गवई उंच उडी-प्रथम, कु. दिपाली मुरलीधर तागड उंच उडी- द्वितीय ,कु.गायत्री महादेव गावंडे ४०० मीटर हर्डल्स- द्वितीय या विद्यार्थ्यांची यवतमाळ येथील विभागीय स्तरावर होणाऱ्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
हे वरील सर्व खेळाडू वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत व सर्व खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गवळी सर, मुख्याध्यापक आर.एन. देशमुख सर तसेच क्रीडाशिक्षक एन.डी. भिंगे व क्रीडा मार्गदर्शक जी.डी. कोरडे यांना देतात.
वरील सर्व खेळाडूंचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयाचे आठ खेळाडू विभागीय स्तरावर पिंपळा ता. मालेगाव "
Post a Comment