-->

अंशदायी पेन्शन योजना ( NPS ) रद्य करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यासाठी " राज्यव्यापी बाईक रॅली " आयोजन

अंशदायी पेन्शन योजना ( NPS ) रद्य करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यासाठी " राज्यव्यापी बाईक रॅली " आयोजन


साप्ताहिक सागर आदित्य/

अंशदायी पेन्शन योजना ( NPS ) रद्य करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यासाठी " राज्यव्यापी बाईक रॅली " आयोजन 

वाशिम - दि. २१/०९/२०२२ रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व संवर्गातील कर्मचारी आणि पंचायत समिती वाशिम च्या सर्व संवर्गातील (ग्राम सेवक, शिक्षक, आरोग्य, सह सर्व संवर्ग) कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद वाशिम येथे सकाळी ११ वाजता मोटार सायकल सह आणि ज्यांच्याकडे हेल्मेट असेल त्यांनी हेल्मेट सह उपस्थित राहून सकाळी ११ वा रॅली ला सुरुवात होऊन जिल्हा परिषद, अकोला नाका, पाटनी चौक, रिसोड नाका, बाकलीवाल विद्यालय, छ.शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौक,पंचायत समिती ,तहसील कार्यालय वरून कलेक्टर ऑफिसला रॅली संपेल. पंचायत समिती वाशिम वगळता इतर पंचायत समिती अंतर्गत सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करावे, पंचायत समिती मधून रॅली काढून गावातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयात रॅली विसर्जित करावी. ज्या ज्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट उपलब्ध आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांनी रॅलीमध्ये हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन अध्यक्ष, सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा वाशिम कडून करण्यात आले.

Related Posts

0 Response to "अंशदायी पेन्शन योजना ( NPS ) रद्य करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यासाठी " राज्यव्यापी बाईक रॅली " आयोजन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article