-->

स्वच्छता हि सेवा:  स्वच्छता फेरी काढुन विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक मुक्तीवर जनजागृती!  पारंपारिक पोतराजने दिला स्वच्छतेचा संदेश.

स्वच्छता हि सेवा: स्वच्छता फेरी काढुन विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक मुक्तीवर जनजागृती! पारंपारिक पोतराजने दिला स्वच्छतेचा संदेश.

 

साप्ताहिक सागर आदित्य 

स्वच्छता हि सेवा:



स्वच्छता फेरी काढुन विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक मुक्तीवर जनजागृती!

पारंपारिक पोतराजने दिला स्वच्छतेचा संदेश. 

वाशिम दि.२१ - 'गाव आपले स्वच्छ ठेवा, माझी पुजा मला पावली... मला पावली जीवनाची गुरुकिल्ली...' पारंपरिक पोतराजाच्या या वांझोड्याने  शिरपुरकरांचे लक्ष वेधले. निमित्त होते स्वच्छता रॅली व प्लॅस्टिक संकलन कार्यक्रमाचे. 

स्वच्छता ही सेवा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छतेचा जागर घालण्यात येत आहे. आज (दि.२१) मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथे सावच्छता रॅली आणि प्लॅस्टिक कचरा (एकल वापरातील) संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत, ढवळे विद्यालय आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी स्वच्छता फेरीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ढवळे विद्यालयाचे मुख्याध्यापक वाहुरवाघ, स्वच्छाग्रही संतोष अढागळे, ग्राम विकास अधिकारी भुरकाडे, विस्तार अधिकारी पळसकर आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सल्लागार यांची उपस्थिती होती. 

रॅली दरम्याम जि.प, उपाध्यक्ष डाॅ. शाम गाभणे यांनी भेट दिली व प्लॅस्टिक संकलन उपक्रमात भाग घेतला.

 रॅलीमध्ये ढवळे विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Posts

0 Response to "स्वच्छता हि सेवा: स्वच्छता फेरी काढुन विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक मुक्तीवर जनजागृती! पारंपारिक पोतराजने दिला स्वच्छतेचा संदेश. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article