
प्रा. दत्तात्रय ढवारे यांना आचार्य पदवी प्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
प्रा. दत्तात्रय ढवारे यांना आचार्य पदवी प्रदान
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय मुकुंदराव ढवारे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत राज्यशास्त्र विषयात डॉ. पॅरेलाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली "चीनचे परराष्ट्र धोरण :भारतापुढील एका आव्हान" या विषयात संशोधन केले असून विद्यापीठाने त्यांना आचार्य पदवी प्रदान केली आहे. प्रा. दत्तात्रय मुकुंदराव ढवारे हे मागील 14 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या संशोधन कार्यात 1950 पासून भारत -चीन संबंध आणि विविध पातळीवर चीन आज भारतासाठी कशा प्रकारे आव्हान निर्माण करत आहे याविषयी आपल्या शोधनिबंधात इ.स. 1950 ते इ. स.2021 पर्यंतच्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
प्रा. दत्तात्रय ढवारे यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल श्री वेंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष ऍड.विजय जाधव सचिव रंगनाथ पांडे , उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव साहेब, रामभाऊ जाधव व अजिंक्यभाऊ जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. तायडे डॉ.संतोष धामणे, डॉ.संतोष इंगोले, डॉ. विजय जाधव, प्रा.कु. रिंकु रुक्के, प्रा. सुनिता अवचार, प्रा. अक्षय इंगळे, प्रा. अभिजित चंदेल, निंबाजी पाचारणे, गजानन बोरकर, ऋषिकेश देशमुख तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.
आपल्या यशाचे श्रेय प्रा. डॉ.दत्तात्रय ढवारे यांनी त्यांचे मार्गदर्शक डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी तसेच आई-वडील व मित्रमंडळी यांना दिले आई-वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार करून मला शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यास पात्र बनविले त्यामुळेच मी आज हे कार्य करू शकलो असे मत व्यक्त केले.
0 Response to "प्रा. दत्तात्रय ढवारे यांना आचार्य पदवी प्रदान "
Post a Comment