
शाळा व्यवस्थापन समिती भटउमरा च्या वतीने साक्षी काळे हिचा गुण गौरव सत्कार सोहळा संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
शाळा व्यवस्थापन समिती भटउमरा च्या वतीने साक्षी काळे हिचा गुण गौरव सत्कार सोहळा संपन्न
भटउमरा येथील नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या कु.साक्षी उद्धव काळे हिचा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने जि प शाळेत मान्यवरांच्या उपस्थित यथोचित सत्कार करण्यात आला .तिची जिद्द, चिकाटी ,एकाग्रता यामुळे तिने या यशाला गवसनी घातली.सर्व प्रथम महापुरुषांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणून लाभलेले सदाशिव काळे प्रमुख पाहुणे जि प सदस्य मोहन चौधरी सर,सरपंच कुंडलिक काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिभाऊ काळे, रमेश ल. काळे (उपसरपंच), वसंतराव डूबे , केशव पेंटर काळे, सुभाष काळे ,गोपाल काळे मोतीराम इंगोले ,शालिग्राम काळे,डॉ विजय काळे, देव इंगोले,विनोद इंगळे,किशोर काळे, राजेश काळे, कैलास राजगुरु, गुणाजी काळे ,हरिभाऊ उमाळे,श्रीकृष्ण रोकड़े, बालाजी काळे, करण आवारे, संजय वि.काळे, केन्द्रप्रमुख कानडे ग्रामसेवक मुठाळ,राजाराम काळे, भोयर, आनंदा काळे,गोलू काळे, विनोद काळे, यशवंत ढाले, अरुण आवारे,किसन रोकडे,शाळेचे मु अ मोहन कांबळे, शिक्षक समाधान गि-हे,मोहन देवळे,वंदना इंगळे,शिल्पा धुळे, अनुराधा सरनाईक उपस्थित होते.
सदाशिव काळे यांनी शाळेकरिता टिव्ही, पंखे, चटई भेट दिल्या .तसेच शाळेकरिता नवीन शौचालया करीता निधी जि प सदस्य मोहन चौधरी यांनी दिल्या बद्दल त्याचे भूमी पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवरानी मार्गदर्शन केले.तसेच सत्कार मूर्ती साक्षी काळे हिने विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका शिल्पा धुळे मॅडम , समाधान गि-हे यांनी केले ,प्रास्ताविक कांबळे यांनी व आभार देवळे यांनी मानले
0 Response to "शाळा व्यवस्थापन समिती भटउमरा च्या वतीने साक्षी काळे हिचा गुण गौरव सत्कार सोहळा संपन्न"
Post a Comment