जिल्हा रुग्णालय अंतर्गत बाकलीवाल शाळेच्या पोस्टरच्या माध्यमातून एनसीसी विद्यार्थ्यांचा नेत्रदान श्रेष्ठदानाचा संदेश
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा रुग्णालय अंतर्गत बाकलीवाल शाळेच्या पोस्टरच्या माध्यमातून एनसीसी विद्यार्थ्यांचा नेत्रदान श्रेष्ठदानाचा संदेश
वाशिम - आज दिनांक 3/9/2024 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल कावरखे ,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अविनाश पुरी यांचे मार्ग मार्ग दर्शनाखाली राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा निमित्त स्थानिक श्री बाकलीवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या विद्यार्थ्यांनी एनसीसी अधिकारी अमोल काळे व जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे यांच्या नेतृत्वात मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी आयोजीत पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून नेत्रदान श्रेष्ठदानाचा संदेश जनसामान्यांना दिला.
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत देशभरात साजरा केला जातो. डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात. नेत्रहीन व्यक्ती निसर्गातील सृष्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत. नेत्रहिनांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी भारत सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. अनेक नेत्रपिढ्या व फिरते नेत्रपथके कार्यरत आहेत. राज्यात सुमारे नऊ लाखापेक्षा जास्त अंध व्यक्ती असून नेत्रदानाच्या व्यापक जनजागृती मार्फत लाखो व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते. या उदात्त हेतूने श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वात ५० विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत सहभाग घेतला. नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर पोस्टरच्या माध्यमातून ‘जीवनाचे अमूल्य वरदान नेत्रहीनाला नेत्रदान’, ‘डोळ्यांना मरण नाही नेत्रदान करा’, ‘नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत ठेवून हे जग पहा’, ‘नेत्रदानाचा संकल्प करा एखाद्याचं आयुष्य उजळून टाका,’ ‘जाने से पहले किसी को देदो जीवनदान, अमर रहना है तो कर दो नेत्रदान’ अशा घोषवाक्यातून जनजागृतीपर संदेश दिला. या पोस्टर स्पर्धेत प्रथम विघ्नेश वानखेडे, द्वितीय नेहा वाळके, तृतीय मनस्वी कोंडाणे तर प्रोत्साहनपर शिवम जाधव यांनी क्रमांक पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व मोहीम साठी ठाकरे व्यवहारे , घुगे,ओम राऊत , ज्ञानेश्वर पोटफोडे गणेश व्यवहारे सुधीर साळवेयांनी परिश्रम घेतले.
0 Response to "जिल्हा रुग्णालय अंतर्गत बाकलीवाल शाळेच्या पोस्टरच्या माध्यमातून एनसीसी विद्यार्थ्यांचा नेत्रदान श्रेष्ठदानाचा संदेश"
Post a Comment