नेत्रदान पंधरवाडयादरम्यान कै. संजय नानासाहेब पाटिल यांचे मरानोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
नेत्रदान पंधरवाडयादरम्यान कै. संजय नानासाहेब पाटिल यांचे मरानोत्तर नेत्रदान
नेत्रबुब्बुळे संकलन केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम
मौजे देवपेठ वाशिम ता. जि. वाशिम येथील रहिवासी असणारे संजय नानासाहेब पाटिल यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दिनांक ०३/०९/२०२४ रोजी रात्री ०८:३० वाजता दुःखद निधन झाले. त्याच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. तसेच संपुर्ण पाटिल कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. संजय नानासाहेब पाटिल यांचे निधन झाल्याने संपूर्ण पाटिल कुटुंबावर दुखाचा डोंगर उभा असताना बजाज कुंटुंबीयांनी एवढ्या दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंघाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान घडविण्यासाठीची अंतिम इच्छा हि मनिष मंत्री यांच्याकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी डॉ. आशिष बेदरकर याच्यां मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, ज्ञानेश्वर पोटफोडे यांनी कै. संजय नानासाहेब पाटिल यांची नेत्र बुबुळे काढून घेतलीत व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे पाठविण्यात आली. नेत्र संकलन करण्यासाठी भगवान मडके, अमोल गोळे, बाळू जाधव, अभिजित पाटील, राम पाटील, गंगाबाई पाटील व सर्व पाटील परिवाराचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव बाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन पाटिल कुटुंबाचे आभार मानले आहेत.
नेत्रदानासाठी संपर्क :-
रमेश गजानन ठाकरे (नेत्रदान समुपदेशक) ९९२२५१९९४८ /ओम राऊत (कार्यक्रम सहाय्यक) ८८०६८८०६४४
0 Response to "नेत्रदान पंधरवाडयादरम्यान कै. संजय नानासाहेब पाटिल यांचे मरानोत्तर नेत्रदान"
Post a Comment