-->

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या  9 आदर्श वस्त्यांची घोषणा

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 9 आदर्श वस्त्यांची घोषणा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या

9 आदर्श वस्त्यांची घोषणा

       वाशिम, : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आदर्श वस्ती घोषीत करण्याबाबत समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नागमोरे यांनी सूचना दिल्या आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील वाशिम तालुक्यातील टणका, सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ, कारंजा तालुक्यातील दिघी, दुघोरा व धनज (बु.), मानोरा तालुक्यातील सोमठाणा, आमगव्हाण, धानोरा (बु.) इत्यादी गावातील वस्त्या आदर्श वस्त्या म्हणून घोषीत करण्यात आल्या आहे. 

        अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठयाची कामे, मलनि:सारण, गटार बांधणे, रस्ते, पोच रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा करणे, वीज पुरवठा, पेवर रस्ता व समाज मंदिर बांधणे इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करुन त्यांच्या सर्वांगीण विकासाची कामे करण्यात येतात.


                                                                                                                                     

Related Posts

0 Response to "अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 9 आदर्श वस्त्यांची घोषणा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article