-->

महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी  जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान

महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान



साप्ताहिक सागर आदित्य 

 महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी

    जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी

जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान


वाशिम, 

"रेशीम शेती ही शाश्वत आणि फायदेशीर पर्याय आहे. महारेशीम अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे  उद्दिष्ट आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि रेशीम शेती व उद्योगाकडे वळावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.


     रेशीम उद्योग हा कृषीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते आज दि.१७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखवून रेशीम जनजागृती रथ जिल्ह्यात मार्गस्थ करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

    महारेशीम अभियान ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. रेशीम रथ ठिकठिकाणी पोहोचून अभियान कालावधीत तुती लागवड करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी ६८२ मनुष्य दिवस मजुरी,  तर रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम करिता २१३ दिवसाची मजुरी असे एकूण ८१५ दिवसांची मजुरी  २९७ रूपये दराने  २ लक्ष ६५ हजार ८१५ कामाच्या प्रगतीनुसार अदा करण्यात येते. तसेच साहित्य खरेदीसाठी १ लक्ष ५३ हजार रू. खरेदीनंतर देण्यात येतात. तीन वर्षात एकूण ४ लक्ष १८ हजार ८१५ रू. दिले जातात. 


अभियानाचे निकष : 

योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी अल्प भूधारक असावा, त्यांच्याकडे जॉब कार्ड असावे, स्वतः च्या नावे जमीन ७/१२,८ अ असावा. सिंचनाची सोय असावी, स्वतः मजूर म्हणून काम करावे. आधार, बँक पासबुक छायाप्रतीसह अर्ज करावा.याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम विभागाशी संपर्क साधावा. आपले सरकार पोर्टलवरसुद्धा तुती लागवडीबाबत नोंदणी करता येते. योजनेच्या पात्रतेनुसार शेतकऱ्यांनी या अभियानकाळात नोंदणी करावी, असे आवाहन श्री. फडके यांनी केले. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "महा रेशीम अभियान: शेतकऱ्यांनसाठी सुवर्णसंधी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिका-यांच्या हस्ते रेशीमरथाला हिरवी झेंडी जिल्ह्यात राबविणार तुती लागवड नोंदणी अभियान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article