उत्कृष्ट आरोग्य सेवा ही जिल्ह्याची ओळख व्हावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल – वाशिम जिल्हा रुग्णालयाचा गौरवशाली सन्मान"
साप्ताहिक सागर आदित्य
उत्कृष्ट आरोग्य सेवा ही जिल्ह्याची ओळख व्हावी
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
"आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल – वाशिम जिल्हा रुग्णालयाचा गौरवशाली सन्मान"
"जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ठोंबरे यांच्या कामगिरीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव
वाशिम,
जिल्हा रुग्णालयाने राज्यस्तरीय क्रमांक १ आणि आरोग्य यंत्रणेला क्रमांक २ मिळवून उत्कृष्ट सेवा कशा प्रकारे दिली जावी याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. हे यश केवळ आरोग्य यंत्रणेतील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अशाच प्रकारे समर्पित कार्य सुरू ठेवण्याची गरज आहे. यशस्वी कार्याबद्दल संपूर्ण आरोग्य विभागाचे अभिनंदन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिमच्यावतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या.
या कार्यक्रमास आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. संतोष सारडा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अविनाश पुरी यांच्यासह आय.एम.ए.च्या सचिव डॉ.सोना नेनवाणी उपस्थित होत्या.
जिल्हा रुग्णालय, वाशीम आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावत महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रमांक १ चा दर्जा पटकावला आहे. तसेच, जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेला राज्यस्तरीय क्रमांक २ मिळाल्याने आरोग्य क्षेत्रात वाशीम जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे मनोगत व्यक्त करतांना बोलले.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिमचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुश्री तरोडे ,श्रीहरी पवार ,श्रुती आरवाडे तर आभार डॉ .स्वाती नागरे यांनी मानले.कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी नर्सिंगचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0 Response to "उत्कृष्ट आरोग्य सेवा ही जिल्ह्याची ओळख व्हावी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "आरोग्य यंत्रणा राज्यात अव्वल – वाशिम जिल्हा रुग्णालयाचा गौरवशाली सन्मान""
Post a Comment