अनन्या मुलगी वाशिमची, अभिमान व शान देशाची
साप्ताहिक सागर आदित्य
अनन्या मुलगी वाशिमची, अभिमान व शान देशाची
वाशिम, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वाशिमच्या कु.अनन्या केशव शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळविले आहे. ही जिल्ह्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्रीम.बुवनेश्वरी एस. यांनी कु.अनन्याचे त्यांच्या दालनात नुकतेच तिचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी देखील तिचे अभिनंदन केले. एखाद्या खेळाडूला त्याने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदना वर्षाव होतो त्यामुळे त्याला पुढे जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते; हे जरी खरे असले तरी पुढे जाण्यासाठी त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक स्तरावर सबळ व सक्षम असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन, तसेच योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे हे देखील आवश्यक आहे.
अनन्याच्या वरील पाच गरजांपैकी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक गरज तिने स्वत:च्या मेहनतीने करत आहे; परंतु तिला सामाजिक आणि आर्थिक गरज पूर्ण करताना तिला अडचणी येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून शासन स्तरावरून याबाबत पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. परंतु समाजानेदेखील याकरिता पुढे येवून तिला जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल आणि तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याकरिता कसा प्रयत्न करता येईल याबाबत सहाय करणे गरजेचे आहे. त्याकरिता समाजातील विविध पदाधिकारी, पुढारी, समाजसेवी संस्था, संघटना यांनी पुढे होवून याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.या सत्काराप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.ठोंबरे व केशव शिंदे उपस्थित होते.
0 Response to "अनन्या मुलगी वाशिमची, अभिमान व शान देशाची"
Post a Comment