विषमता गाडून समतेचा जागर करणे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल... प्रा. गुलाब श्रीपत साबळे
साप्ताहिक सागर आदित्य
विषमता गाडून समतेचा जागर करणे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल... प्रा. गुलाब श्रीपत साबळे
रिसोड येथील नामांकित उपक्रमशील एकमेव मुलींची भारत माध्यमिक कन्या शाळा व व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे व प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर.बी.देशमुख सर, प्रा. पी.एच. मोरे ,प्रा.शाम चौमवाल सर हे होते. सुरुवातीला या सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे दीप धुपाने मालाअर्पण व पूजा करून .त्यानंतर व अतिथींचे शब्दसुमनाने स्वागत मान्यता भोसले हिने स्वागत गीत गाऊन केले . त्यानंतर विद्यार्थिनीने मनोगत , गीत व चारोळ्या आणि पोवाडे सादर केले. त्यामध्ये आरती साळवे, समृद्धी खडसे, आरती गव्हाणे, लक्ष्मी गवळी ,शैला कौटकर, धनश्री कौटकर ,अपूर्वा मोरे, वेदिका गोंधळे ,मोनिका भोपाळे, वैष्णवी शेळके, आरती गोल्हारे, खुशी नरवाडे, दुर्गा डोरले, अनुष्का लोखंडे, सृष्टी जहीराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर जीवन रूपी प्रकाश टाकला . तसेच सोनाक्षी कांबळे, भूमिका चतरकर, साक्षी गायकवाड, मोनू गवळी या विद्यार्थिनींनी बहारदार पोवाडे व गीते गाऊन वेगळ्या प्रकारची बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच प्रमुख अतिथी मध्ये प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षक अर.बी. देशमुख सर यांनी आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य किती महान आणि अजरामर आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे सूचक विधान मनोगतातून व्यक्त केले. तसेच प्रा. पी.एच मोरे सर यांनी आजच्या या महापरिनिर्वाण दिनी माणसा माणसातील भेदभाव मिटून सर्वांनी समतेचा जागर करावा असे सूचक विधान केले. प्रा.शाम चौवमाल सर यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार हे प्रत्येक विद्यार्थिनींनी आचरणात आणावे असा सूचक सल्ला आपल्या मनोगतातून दिला. प्रा.पंजाबराव पानझाडे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशाची उच्च शिखरे पादाक्रांत केली. आपण सुद्धा यशाच्या उच्च शिखरावर चांगल्या मार्गाने जाल व परिस्थितीचा बाऊ न करता यश संपादन करा असा मोलाचा संदेश दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणातून प्रा .गुलाब साबळे सर सर यांनी विषमता गाडून समतेचा जागर करणे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल . तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा सांगत असताना सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व जीवन पटलावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन किरण पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृतिका टिकाईत हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to " विषमता गाडून समतेचा जागर करणे हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल... प्रा. गुलाब श्रीपत साबळे "
Post a Comment