-->

 सैनिकांमुळे देश सुरक्षित                                   बुवनेश्वरी एस  •  जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ  •   उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

सैनिकांमुळे देश सुरक्षित बुवनेश्वरी एस • जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ • उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सैनिकांमुळे देश सुरक्षित 

                                बुवनेश्वरी एस

•  जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

•   उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव


वाशिम, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते आज ९ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिदांच्या स्मृतीचिन्हास श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी मान्यवरांसह सभागृहात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी जागेवर उभे राहून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. 


जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी शहिद शिपाई यशवंत सरकटे यांच्या वीरपत्नी श्रीमती शांताबाई सरकटे,शहिद शिपाई दगडू लहाणे यांच्या वीरपत्नी श्रीमती पार्वतीबाई लहाणे व शहिद नायक अमोल गोरे यांच्या वीरपत्नी श्रीमती वैशाली गोरे ,वीर पत्नी मीराबाई नागुलकर यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. 


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२४ निधी संकलन शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी  सशस्त्र सेना ध्वज प्रदान करुन निधी संकलनाची सुरुवात केली.शासनाने सन २०२४ या वर्षाकरीता जिल्हयाला ४८ लक्ष  रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हयातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालये तसेच विविध संघटनांच्या योगदानातून जिल्हयाने १२० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.


जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाची घोषणा केली.देशाचे रक्षण करतांना विरगती प्राप्त झालेल्या शुरवीर सैनिक हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच युध्दात लढतांना ज्या सैनिकांना अपंगत्व आले आहे,अशा सैनिकांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलीत करण्यात येतो.जिल्हयातील नागरीकांनी भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी तन मन धनाने पुढे यावे असे आवाहन श्रीमती बुवनेश्वरी यांनी यावेळी केले. 


सशस्त्र सेना ध्वजदिन २०२३ चे उत्कृष्ट निधी संकलनाप्रित्यर्थ राज्य शासनाकडून प्राप्त झालेले स्मृतीचिन्ह जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी प्रदान केले. 


यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते  इयत्ता १० वी मध्ये ९६ टक्के गुण मिळाल्याबद्दल कृष्णा राठोड हिचा विशेष गौरव पुरस्कारांतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. 

व  मान्यवरांच्या हस्ते  उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

 

प्रारंभी कल्याण संघटक संजय देशपांडे यांनी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.तसेच प्रधानमंत्री , राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्या संदेशाचे वाचन केले. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची,माजी सैनिकांची तसेच माजी सैनिकांचे कुटूंबिय व विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी तर उपस्थितांचे आभार कॅप्टन संजय यलमर यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमात बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, सैनिक कल्याण कार्यालय कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. 

                    

0 Response to " सैनिकांमुळे देश सुरक्षित बुवनेश्वरी एस • जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ • उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article