य.च. सैनिक शाळेत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड चाचणी
साप्ताहिक सागर आदित्य
य.च. सैनिक शाळेत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड चाचणी
यशवंत योग असोसिएशन सलग्नित महाराष्ट्र योगा असोसिएशन मार्गदर्शनाखाली योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व त्यामधून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर जिल्हास्तरीय योग स्पर्धा रविवार दिनांक २५. ८.२०२४ वेळ सकाळी १०.०० वाजता सांस्कृतिक सभागृह यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला येथे संपन्न होणार आहे.
वरील योगासन स्पर्धा ही खालील वयोगटाप्रमाणे घेण्यात येईल. यामध्ये वयोगट-०८ ते १०, १० ते १२,१२ते १४,१४ते१६,१६ ते१८,१८ ते २१ मुले / मुली तसेच वयोगट २१ ते २५, २५ ते ३०,३० ते ३५, ३५ ते ४५
व ४५ वर्षापुढील पुरुष व स्त्री अशा विविध गटात घेण्यात येणार आहे.
सहभागी योग स्पर्धकांना आपल्या वयोगटातील एकूण दहा आसनांपैकी किमान पाच आसने लॉटरी पद्धतीने काढल्या जातील. सदर योगासन स्पर्धेचा अभ्यासक्रम
वेबसाईटवर उपलब्ध आहे.
स्पर्धेसंबंधी काही
अडचण असल्यास आयोजकांशी संपर्क साधावा. सदर योगासन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व योग साधकांनी सहभागी होण्याचे आवाहन वाशिम जिल्हा यशवंत योग असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे. वरील स्पर्धेकरिता काही अडचण असल्यास प्राचार्य एम. एस. भोयर, स्पर्धा प्रमूख आर. ए. सरनाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा यशवंत योग असोसियेशन तर्फे करण्यात आली आहे.
0 Response to "य.च. सैनिक शाळेत राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड चाचणी"
Post a Comment