
श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
पिंपळा:- पिंपळा येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन.देशमुख सर तर प्रमुख अतिथी तथा सत्कारमुर्ती म्हणून खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू उमेशभाऊ इंगोले तसेच विद्यालयातील राज्यस्तरीय खेळाडू कु.प्रियंका भगत व कु.राधा धोंगडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख खेळाडू यांच्या हस्ते पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.प्रास्ताविक पर भाषणातून विद्यालयाचे जी.डी.कोरडे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन.देशमुख सर यांच्या हस्ते खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू उमेशभाऊ इंगोले यांचा शाल, पुष्पगुच्छ तथा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय खेळाडू कु.प्रियंका भगत व कु.राधा धोंगडे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य आर.एन.देशमुख सर यांनी विविध खेळ प्रकार व त्याचे महत्त्व आपल्या खुमासदार बोलीभाषेत विद्यार्थ्यांसमोर विशद केले.सत्कारमुर्ती उमेशभाऊ इंगोले यांनी विद्यालयातील खेळाडूंना खो-खो चे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खो-खो, कबड्डी तथा मैदानी खेळ घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील क्रीडाशिक्षक एन.डी.भिंगे सर तर आभारप्रदर्शन एस.बी.देशमुख सर यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद तथा ५ वी ते १२वी चे सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा "
Post a Comment