"नेत्रदान" "नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान"
साप्ताहिक सागर आदित्य
"नेत्रदान"
"नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान"
दिनांक २५ ऑगष्ट ते ८ सप्टेंबर नेत्रदान पंधरवाडा आपण साजरा करीत असतो. दानात दान जर कोणते असेल तर ते नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान आहे, माणूस जन्माला आला काही करण्याकरीता प्रत्येक जीव हया पृथ्वीतलावर आपल्या हातून काही पुण्यकार्य घडावे, आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे, या आशेमधून जगत असतो.
माणूस श्रीमंत असो की, गरीब प्रत्येकाला वाटत आपल्या देहाचा कर्मरुपी मार्गाने उपयोग व्हावा, देह झिजुनी चंदनापरी दरवळावा. अस महात्म्य मिळवून देणारा मार्ग हा एक देहदाना सारखाच नेत्रदानाचा मार्ग आहे.
मरणोपरांत हा देह मातीमधे, अग्नीमधे विलीन होतो. पण हया देहाला सुध्दा परमेश्वराने दानाचे औचित्य साध्य करुन दिले आहे. म्हणतात ना नेत्रदान करावे दृष्टीरुपी उरावे. व्यक्तीच्या नेत्रदानातून आपण आज एक किंवा दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान करु शकतो. कितीतरी अंध व्यक्ती अंधःकारमय आयुष्य जगत आहेत. त्यांना प्रकाशमय करुन आपण त्यांच्या डोळयांनी हे जग, हा निसर्ग, हे सौदर्य पाहण्याचे अनमोल कार्य करु शकतो.
आज भारतामध्ये अंध व्यक्तींची संख्या बरीच असून हया मधे बुबुळाच्या आजाराने अंधत्व असलेले रुग्ण बरेच आहेत. अशा अंध व्यक्तींना नेत्रदान करुन त्याच्या डोळयांना प्रकाशमय करुन, मरणोपरांत सुध्दा नेत्ररुपी उरु शकतो. चला तर हया कार्याला आपणच सुरुवात करु या.
जगाच्या पाठीवर व शेजारी असा एक छोटासा देश आहे. श्रीलंका कि त्या देशामधुन मरणोपरांत नेत्रदान कलेले बुब्बुळे गरजूंना पुरविल्या जातात. जणू त्यांनी हा संकल्पच केलेला आहे. मात्र आपला देश लोकसंख्येमधे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण प्रत्यक्षात नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. याला कारण म्हणजे आपल्या मधील अज्ञान व अंधश्रध्दा, चला तर आपण संकल्प करु या, नेत्रदान करुन दृष्टी प्रदान करु या.
आपल्या देशात बऱ्याच लोकांचा असा गैर समज आहे की, नेत्रदान केल्याने पूढचा जन्म अंध म्हणून येईल. पंरतू परमेश्वराने सुध्दा सांगितले आहे. हे मानवा हा जन्म तुला कार्य करण्याकरिता दिला आहे यानंतर तुला फक्त मोक्ष प्राप्त करायचा आहे. जा तु देहाला झिजव, चांगल्या कर्माने, आपल्या मानव जन्माचे सार्थक कर असा सुदंर उपदेश केला आहे. म्हणून आपल्या अज्ञानरुपी अंधाराला दुर करुन, आपल्या देहाला समाजाला दान करुन आपल्या जन्माच सार्थक करावयाचे आहे.
नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये रुढ आहे. परंतू आपणाला ज्ञानरुपी प्रकाशाने याला दुर सारायचे आहे. नेत्रदान कोणत्याही व्यक्तीला करता येते. यामध्ये लिंगभेद अथवा वयाचे बंधन नाही. काही आजार सोडले तर सामान्य माणसाला ज्यांची बुब्बुळे चांगली आहे. अशा व्यक्तींना नेत्रदान करता येते.
आज आपल्या देशात राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत नेत्रदानाचे महान कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, वैद्यकिय महाविद्यालये, व स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहे.
नेत्रदान करायचे कसे, व त्याबाबत सर्व माहिती प्रत्येक दवाखान्यामध्ये आरोग्य कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी यांच्या माध्यमातुन मिळवता येऊ शकते.
आपण ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये राहतो त्या समाजाच काही देण आहे. हि भावना आपल्या मनी ठेवून आपण हया कार्याला वाढवू या. नेत्रदानासारख्या सामाजहिताच्या कार्यात सहभागी होऊन जनतेने लाभ घ्यावा. उतस्फुर्तपणे नेत्रदान संकल्प करुन नेत्रदान करण्यास पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अविनाश पूरी व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अषिश बेदरकर यांनी केले आहे.
नेत्रदानासाठी संपर्क
रमेश गजानन ठाकरे (नेत्रदान समुपदेशक) ९९२२५१९९४८ / ८८०६८८०६४४
0 Response to ""नेत्रदान" "नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान""
Post a Comment