-->

२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

वाशिम, कारगील विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या दिवसांपैकी एक आहे.शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा २४ वा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

        यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम व अपूर्वा बारसू,निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी (महसूल ) मोहन जोशी,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            श्रीमती बुवनेश्वरी यांनी उपस्थित वीर पत्नी शांताबाई सरकटे, पार्वतीबाई दगडू लहाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

         कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक संजय देशपांडे, वरिष्ठ लिपिक रामधन राऊत,रविंद्र डोंगरदिवे,दिनेश आपटे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती सविता डांगे,मीरा पुरोहित यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी,माजी सैनिक उपस्थित होते.

         आज कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत शहीद जवान स्व.अमोल गोरे यांच्या गावी मौजे  सोनखास येथे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कल्याण संघटक संजय देशपांडे यांनी केले.

Related Posts

0 Response to "२४ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article