-->

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  जिल्हा माहिती कार्यालयात एका प्रशिक्षणार्थ्याची निवड

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा माहिती कार्यालयात एका प्रशिक्षणार्थ्याची निवड

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

जिल्हा माहिती कार्यालयात एका प्रशिक्षणार्थ्याची निवड


वाशिम, युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय व निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध होणार असून वाशिम येथील जिल्हा माहिती कार्यालयात एका उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.महसूल पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी श्रीमती. बुवनेश्वरी एस. यांचे हस्ते आज ७ ऑगस्ट रोजी अमोल जाधव या प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांला नियुक्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्याचे अभिनंदन केले व त्याला त्याच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दीन काझी, वरिष्ठ लिपिक राजु जाधव, लिपिक विजय राठोड , गजानन डाहाके, अनिल कुरकुटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे प्रदीप नेमाडे, संजय उगले आदी उपस्थित होते. 

      या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. युवा सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अत्यंत प्रेरणादायी ठरेल. निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ मिळेल. ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती साधता येईल. या योजनेंतर्गत १२ वी पास उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत सहा हजार, आयटीआय, पदविका उमेदवारास आठ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारास दहा हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त पात्र युवक - युवतींनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीद्वारे या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

0 Response to "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा माहिती कार्यालयात एका प्रशिक्षणार्थ्याची निवड"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article