नेत्रदान करुन अंधाच्या आयुष्यात प्रकाश आणुया (मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे)
साप्ताहिक सागर आदित्य
नेत्रदान करुन अंधाच्या आयुष्यात प्रकाश आणुया
(मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे)
सृष्टी खुप सुंदर, मनमोहक अन् विलोभनिय आहे. मात्र, हे जग आपल्या डोळयांनी पाहण्याचे भाग्य सर्वांनाच लाभत नाही. विचार करा दोन्ही डोळयांनी अंध असलेल्या व्यक्तीची काय अवस्था असेल? मानुस ९० टक्के जग डोळयांनीच जाणुन घेतो. साधे डोळे आले तरी आपण घाबरतो मग अंध कसे जिवन जगत असतील? याचा विचार आपन करतो का? तथापी मरनोत्तर नेत्रदान करुन आपण अंधाना दृष्टी देउ शकतो असे वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आवाहन केले.
खंडप्राय भारत देशामधे मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने अद्यापही बरेच अंध रुग्ण नेत्र ब्बुब्बुळांच्या प्रतिक्षेत अंधकारमय जिवन जगत आहेत. खुप लोक भारतामध्ये कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंध होतात. जास्तीत जास्त अंध पंधरा वर्षाखालील मुले असतात या सर्व अंधाना दृष्टी मिळवण्यासाठी काय करावे लागते तर त्यासाठी मरणोपरांत नेत्रदान करावे लागते. नेत्रदानाने कॉर्निया बदलली जाउन त्यांना दृष्टी मिळते. आपल्या मृत्यु पश्चात आपले डोळे ८ तास जिवंत राहतात यामागे विधात्याचे काय म्हणने असेल हे आपण समजुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही समाजामध्ये / जातीमध्ये / धर्मामध्ये नेत्रदान करण्यास विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही धर्मामध्ये नेत्रदान करता येते.
त्यामूळे जास्तीत जास्त मरणोत्तर नेत्रदान घडवून आणावे हि आपली सामाजिक जबाबदारी आहे. नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज समाजात असुन ते दुर करण्याकरीता वाशिम येथील नेत्रबुबुळे संकलन केंद्र सदैव प्रयत्नशिल असते. या करीता जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी नेत्रदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येते. मा. मूख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्हयातील सर्व नागरीकांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करावी तसेच नेत्रदान घडवून आणावे असे आवाहन केले आहे.
नेत्रदानासाठी संपर्क :-
रमेश गजानन ठाकरे (नेत्रदान समुपदेशक) ९९२२५१९९४८ /
८८०६८८०६४४
१) कोणत्याही धर्मात नेत्रदानाला विरोध केला जात नाही.
२) नेत्रदानाला वयोमर्यादा नाही.
३) मधुमेह/उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तीही नेत्रदान करु शकतात.
४) मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक सुध्दा त्या व्यक्तींचे नेत्रदान करण्यास
परवाणगी देउ शकतात.
५) मृत व्यक्तीचे डोळे काढल्यावर चेहरा विदृप होत नाही.
६) मृत्युनंतर डोळे ६ ते ८ तासांच्या आत काढावे लागता.
0 Response to "नेत्रदान करुन अंधाच्या आयुष्यात प्रकाश आणुया (मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे)"
Post a Comment