गोरेगावच्या पालखी पदयात्रेकरीता कारंजात आज आनंदोत्सव !
गोरेगावच्या पालखी पदयात्रेकरीता कारंजात आज आनंदोत्सव !
कारंजा : येत्या फाल्गुन शुद्ध सप्तमी, बुधवार दि .9 मार्च 2022 रोजी, प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कारंजा पंचक्रोशित येणाऱ्या, दारव्हा तालुक्यातील, श्रीक्षेत्र धामणगाव (देव)येथील, महान विभूती, परमहंस संत श्री मुंगसाजी माऊलीची पुण्यतिथी साजरी होत आहे . त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून येथे दिंडया पालख्या येऊन दरवर्षी वैष्णवांचा मेळा भरत असतो . परंतु हा महोत्सव अनपेक्षित अशा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्ष, खंडीत झालेला होता . आज मात्र कोरोना महामारीवर मात मिळविण्यात समाज व्यवस्था यशस्वी झाल्याने, महाराष्ट्र शासनानेही, सण - उत्सव - पालख्या -दिंड्या - सांस्कृतिक महोत्सवला परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळेच, परमहंस संत श्री . मुंगसाजी माऊलींचे परम शिष्य असलेले, श्रीक्षेत्र गोरेगाव / पुंडलिकनगर मुर्तिजापूरचे लाडके शिष्य, परमहंस संत पुंडलिक बाबांची पालखी पदयात्रा, श्रीक्षेत्र धामणगाव ( देव ) येथे जाण्याकरीता, आज रविवार दि .6 मार्च 2022 रोजी कारंजा ( लाड ) येथे येत असून, पालखीच्या स्वागता करीता, कारंजा येथील, माऊली सेवा समिती, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा, संत नामदेव महाराज मंदिर इत्यादींनी जय्यत तय्यारी केली आहे . याबाबत वृत्त देतांना, माऊली परिवाराचे प्रसिद्धी प्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे की, श्रीक्षेत्र जुडवा हनुमान येथून, संत पुंडलिक बाबांच्या पालखीचे आगमन सकाळी 11:00 वाजता, श्री झुलेलाल मंदिर, सिंधी कॅम्प कारंजा येथे होईल . तेथे बच्चुसेठ केसवानी, भगवानसेठ खेमवानी, घनश्यामदास खेमवानी, श्री नवशक्तीधाम, सिंधी पंचायत इत्यादी कडून, श्रीच्या पालखीचे भव्य स्वागत होईल त्यानंतर नेहरू चौक मार्गाने, श्री मधुकरराव मापारी महाराज, टिळक चौक येथे दुपारी 04 :00 वाजता, माऊली सेवा समितीचे, सुरेशभाऊ गढवाले, माजी नगरसेवक नितीन गढवाले, योगेश गढवाले, रूपेश गढवाले, सुनिल गुंठेवार, संजय कडोळे, विजय खंडार, शरद पवार, अनिल कऱ्हे, उमेश अनासाने , अरविंद गुंठेवार, माणिकराव हांडे,व संपूर्ण माऊली सेवा समितीकडून भव्य स्वागत समारंभ होईल . त्यानंतर श्री रेणुका माता मंदिर, सुनिल माकृवार यांचे कडून, महाराणा प्रताप चौक कारंजा येथे विनोद गुल्हाने यांचे कडे, संत गजानन महाराज मंदिर पोलिस स्टेशन मार्गे, श्री गुरुमंदिर व संत नामदेव महाराज मंदिर कारंजा येथे पालखीचा मुक्काम असणार असल्याची माहिती प्राप्त झालेली असून उद्या सोमवार दि .7 मार्च रोजी सकाळी जांब - वैदखेड मार्गे उंबर्डा बाजार कडे रवाना होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात, वारकरी मंडळाचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे .
0 Response to "गोरेगावच्या पालखी पदयात्रेकरीता कारंजात आज आनंदोत्सव !"
Post a Comment