विष्णुपंत भुतेकर यांचा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असो. कडुन सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य/
विष्णुपंत भुतेकर यांचा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असो. कडुन सत्कार
रिसोड - भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचा रिसोड स्थीत भुमीपुत्र कार्यालयात आज केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट आसोशिएशन कडुन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात भूमिपुत्र कडुन करण्यात आलेल्या समाजोपयोगी कामा बद्दल सदर सत्कार करण्यात आला. कोरोना काळात सर्व पक्ष आणि संघटना पळ काढत होत्या त्याच वेळेस भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी झोकून देऊन काम करीत होते. गावागावात फवारणी आसेल. अन्नाचे वाटप आसेल. सोबत रूग्णना मदत करण्यापासून तर समाजाला धीर देत संघटना जिल्हाभर उभी होती. कोरोना काळात हळदीचे भाव प्रचंड पडलेले असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अंगाला हळद लावून हळदीच्या भावाचे आंदोलन महाराष्ट्र, कर्नाटक, तेलगांना मध्ये गाजले. कोरोना काळात गलवान खोर्यातील सैनिकांवरील चिनच्या भ्याड हल्याचा निषेध रस्त्यावर उतरून सर्वप्रथम भूमिपुत्र ने केला. कोरोना काळात वैधव्य प्राप्त भगीनींच्या घरी जाऊन साडी-चोळी भेट देऊन अनोखी आणि सामाजिक जाणीव जपणारी भाऊबीज भूमिपुत्र ने केली या सर्व कामाची दखल घेत आज केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट आसोशिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील सिरसाट, सचिव नंदकिशोरजी झंवर, इ. सी. मेबंर अमोल पाटील सरकटे, रिसोड तालुका अध्यक्ष हरिभाऊ खोडके, ग्रेटर केमिस्ट सदस्य रूपेश पाटील बाजड, प्रदीप जावळे, भूमिपुत्र विधी सेवा जिल्हाध्यक्ष अँड. हिरामण मोरे, गजानन सदार आदींची उपस्थिती होती.
0 Response to "विष्णुपंत भुतेकर यांचा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असो. कडुन सत्कार "
Post a Comment