प्रकल्प संचालक किरण कोवे यांची सभा; मॉडेल व्हिलेज वर फोकस: सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्या.
साप्ताहिक सागर आदित्य
प्रकल्प संचालक किरण कोवे यांची सभा;
मॉडेल व्हिलेज वर फोकस: सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्या.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विभागाची सोमवारी बैठक घेतली. बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे मॉडेल करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील कामांना गती देण्याबाबत नियोजन करण्यात आले.
ओडीएफ प्लस गावे मॉडेल घोषित करण्यामध्ये सर्व तालुके मागे असुन त्यामध्ये प्रगती करण्याबाबत निर्देश देण्यात आले. ओडीएफ प्लस गावे मॉडेल घोषित करण्याकरीता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये सेग्रीगेशन शेड आणि शोषखड्डे तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावातील ही कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
---------------------
मॉडेल व्हिलेज साठी तालुकास्तरीय बैठकांची फेरी पूर्ण:
जिल्ह्यातील गावे मॉडेल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू यांनी दोन महिन्यापूर्वी तालुका निहाय बैठकीची एक फेरी पूर्ण केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर सर्व गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी या कामाला प्राधान्य दिले होते. मात्र मागील काही दिवसात या कामामध्ये सर्व तालुके मागे पडले असल्याचे निदर्शनास येत आहे.
-------------------
स्वच्छतेसाठी दररोज गृहभेटी:
शासनाच्या वतीने ओला व सुका कचरा संकलनाबाबत ग्रामस्तरावर जागृती करण्याकरीता गावातील संवादकांमार्फत गृहभेटी देण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याची स्वतंत्र गुगल लिंक जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. ती लिंक तालुकास्तरावरुन गावस्तरावर सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, ऑपरेटर, स्वस्त धान्य दुकानदार, आशा, अंगणवाडी सेविका, निगराणी समिती सदस्य, बचत गटाच्या महिला, उमेद अभियानातील महिला इत्यादिंपर्यत पोहोचवुन आपल्या तालुक्याचे गृहभेटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी केले.
--------------------
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देलेल्या निर्देशानुसार यापूर्वी गाव स्तरावर ग्राम स्वच्छता निगरानी समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची तालुक्यातील सर्व गावांची अद्यावत माहिती व तालुकास्तरावरील समिती याबाबतची माहिती अद्यापही तालुका स्तरावरुन प्राप्त न झाल्यामुळे कोवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीला जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार, आशिष हिरेखन, एमआरजीएस चे संदीप खिल्लारे, स्वच्छ भारत मिशनचे प्रफुल्ल काळे, सुमेर चाणेकर आदींची उपस्थिती होती.
-------------------
0 Response to "प्रकल्प संचालक किरण कोवे यांची सभा; मॉडेल व्हिलेज वर फोकस: सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्या."
Post a Comment