पशुसंवर्धनाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व चर्चासत्र संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
पशुसंवर्धनाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व चर्चासत्र संपन्न
वाशिम (जिमाका): पशुसंवर्धन विभागाच्या ॲस्कॅड योजनेअंतर्गत पशुसंवर्धनाबाबत नुकताच एक
दिवसीय प्रशिक्षण शिबीर व चर्चासत्र जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपन्न झाले.
या शिबिरामध्ये लसीकरण, भारत पशुधन ॲप, वंध्यत्व निवारण व विविध योजनांच्या प्रचार प्रसिध्दीसाठी तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबीर व चर्चासत्रास जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन सहायक आयुक्त, पशुधन विकास
अधिकारी, पशुधन विकास अधिकारी (वि.), सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते.
0 Response to "पशुसंवर्धनाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर व चर्चासत्र संपन्न"
Post a Comment