-->

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाधान माने यांची नियुक्ती

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाधान माने यांची नियुक्ती



साप्ताहिक सागर आदित्य 

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाधान माने यांची नियुक्ती

वाशिम - राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप  यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये नव्याने कार्यकारिणी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने  ढोके हॉस्पिटल,वाशीम येथे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राष्ट्रीय नेते मा.आ.पुरुषोत्तम राजगुरू  यांच्या हस्ते समाधान माने यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

       माने यांनी मागील अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर राहून जिह्यामध्ये समाज बांधवांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी मजबूत केली. मागील २५ वर्षाच्या कार्याचा त्यांचा अनुभव आणि समाजाच्या न्याय,हक्कासाठी लढणारा म्हणून त्यांची ओळख तसेच सर्वांना बरोबर घेऊन चालणारे असे व्यक्तिमत्व.या सर्व त्यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेत त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यामुळे समाजातील सर्व समाज बांधवांना समाधान झाले. सर्वांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. 

    दिलेली जबाबदारीला, टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची माने यांनी सर्वांना खात्री दिली आणि यापुढेही असेच कार्य संघटनेच्या माध्यमातून करत राहील,असे सांगितले. 

      या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. सीमाताई राजगुरु तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश सदस्य चंद्रकांत इंगळे, राजेश वजीरे, महिला आघाडी प्रदेश सदस्या सौ.संगीताताई राजगुरू,सौ.ज्योतीताई इंगळे,युवा आघाडी प्रदेश सदस्य राहुल तुपसांडे,जिल्हाध्यक्ष डॉ.दीपक ढोके, जी.प.सदस्या सौ.शोभाताई शेगोकार इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.बैठकीच्या सुरवातीला गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले व मान्यवरांचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्यातून माजी जि.प.समाज कल्याण सभापती कुंडलिक शेगोकार, सौ चित्रा दायेदार.गणेश राजगुरे,प्रल्हाद हंकारे, गोपाल खिराडे,आत्माराम राजगुरे,अजय परसे,नारायण वाढे,शिवशंकर इंगळे,सुरेश घुडे,विष्णू राजगुरू,संतोष राजगुरू करंजी,राजकुमार राजगुरू,गजानन इंगोले,केशव इंगळे, गोपाल शेगोकार, जगदीश नाचणे, विष्णू ढोके, कैलास पानझाडे , हनुमान खंडारे,प्रल्हाद पानझाडे,संदीप राजगुरे, राजू ठोसरे, खुशाल राजगुरे, ज्ञानेश्वर अंबाळकर, स्वप्निल गव्हाळे, संदीप माठे ,इ.मोठ्यासंख्येने 

पदाधिकारी तसेच समाजबांधव महिला- भगिनी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव संतोष आमले यांनी तर आभार प्रदर्शन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश खंडारे यांनी केले.

0 Response to "राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी समाधान माने यांची नियुक्ती"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article