-->

अमरावती येथे उद्या विभागीय रोजगार मेळावा  १९८२ रिक्त पदासाठी भरती ; हजारो हातांना रोजगार मिळणार

अमरावती येथे उद्या विभागीय रोजगार मेळावा १९८२ रिक्त पदासाठी भरती ; हजारो हातांना रोजगार मिळणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अमरावती येथे उद्या विभागीय रोजगार मेळावा

१९८२ रिक्त पदासाठी भरती ; हजारो हातांना रोजगार मिळणार


वाशिम  :    जिल्ह्यातील नोकरी व रोजगार इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने  बुधवार १४ फेब्रुवारी रोजी श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती जि. अमरावती येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


                   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्री. संत शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय, मोशी रोड, अमरावती यांचे संयुक्त  विद्यमाने  हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


 


             या विभागीय रोजगार मेळाव्यामध्ये, पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा. लि. अमरावती,  जिनीअस इंन्फ्रा प्रा. लि., सि-पॅट व्होकेशनल ट्रेनींग, छत्रपती संभाजीनगर, ई.सी.ई इंडीया एनजी प्रा. लि. अमरावती,  पियाजिओ व्हेवीकल्स  प्रा. लि. बारामती  पुणे,  रेडीयंट सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल, अमरावती, उद्योगमित्र कंसलटन्सी प्रा. लि.,  जाधव ग्रुप ऑफ कंपनी, अमरावती,  संजीव ऑटो पार्ट मॅन्यूफॅक्चरींग प्रा. छ. संभाजीनगर, सनशाईन सुपरस्पेशालोटी हॉस्पीटल, अमरावती  कल्पतरु स्कील डेव्हलख्येंट अकॅडमी, नाशिक,  स्वतंत्र मायक्रोफायनन्स प्रा. लि. अमरावती,  एल.आय.सी. कार्यालय, अमरावती,  द यूनीवर्सेल ग्रुप असोसिएट कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. नागपूर,  पटले एज्युस्कील फाऊंडेशन प्रा. लि. नागपूर,  कोअर प्रोजेक्ट इंजीनिअर ॲण्ड कन्सलटंट प्रा. लि. अमरावती,  संसुर सृष्टी इंडीया प्रा. लि. अकोला व अमरावती इ. नामांकीत कंपनी व उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी विभागीय रोजगार मेळाव्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहून नोकरी इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड प्रक्रिया पूर्ण करतील.


 


             यासाठी किमान इयत्ता ५ वी ते पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), आय. टी. आय. (सर्व ट्रेडस), पदव्यूत्तर  पदवी (सर्व शाखा), अभियांत्रिकी पदविधर व पदविकाधारक. एम. बि. ए. इ. शैक्षणीक तसेच तांत्रिक पात्रता असणारे


 १८ ते ४५वयोगटातील युवक-युवतीना १९८२ पेक्षा जास्त रिक्तपदांकरीता रोजगार मिळवण्याची संधी प्राप्त  होणार आहे.


 


             त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील रोजगार इच्छुक स्त्री व पुरुष उमेदवारांनी रोजगार मेळावा  ठिकाणी प्रत्यक्षपणे उपस्थित राहून मुलाखतद्यावी. तसेच या विभागीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या   उमेदवारांनी त्यांचेकडील सेवायोजन कार्ड च्या युझरनेम व पासवर्ड मधुन मेळाव्यात सहभागी होता येईल, असे  आवाहन विद्या शितोळे, सहायक आयुक्त, जिल्हा कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांनी कळविले आहे.


              या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी एम्लॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रजिस्ट्रेशन करुन अर्ज करावे.


 



0 Response to "अमरावती येथे उद्या विभागीय रोजगार मेळावा १९८२ रिक्त पदासाठी भरती ; हजारो हातांना रोजगार मिळणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article