-->

राष्ट्रीय आट्यापाट्या संघात श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील खेळाडूचा समावेश

राष्ट्रीय आट्यापाट्या संघात श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील खेळाडूचा समावेश

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय आट्यापाट्या संघात श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील खेळाडूचा समावेश

जय गजानन महाराज क्रीडा मंडळ व जिल्हा असोसिएशनच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड करण्यात आली त्यामध्ये श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथील कुमारी शिवानी रामचंद्र धोंगडे या विद्यार्थ्यांनी शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर आट्यापाट्या चॅम्पियनशिप 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे

राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा संघासाठी उत्कृष्ट खेळाची कामगिरी करत या खेळाडूंनी राज्याच्या संघात आपले स्थान निश्चित केले आहे राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉक्टर उमाकांत चकोले यांनी खेळाडूंना संघात समावेशाचे पत्र दिले

स्पर्धेमध्ये निवड होण्याकरिता सदर मुलीला विद्यालयाचे प्राचार्य  आर एन देशमुख सर क्रीडा शिक्षक विकास शिंदे सर क्रीडा मार्गदर्शक गजानन कोरडे सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सागर दादा गुल्हाने सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अजित भुरे साहेब तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवानी रामचंद्र धोंगडे ह्याची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्राचार्य देशमुख सर क्रीडा शिक्षक शिंदे सर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने शिवानी चा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शिवानी धोंगडे तिचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

0 Response to "राष्ट्रीय आट्यापाट्या संघात श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयातील खेळाडूचा समावेश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article