महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
"आम्ही आहोत महिला मतदार मतदानाचा हक्क अवश्य बजावणार"
मतदान जनजागृती बाबत विद्यार्थिनींची प्रभात फेरी
जिल्हाधिकारी यांनी महिला मतदारदारांशी साधला संवाद
महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अधिकाराचा वापर करावा, आपण केलेले मतदान गोपनीय असते त्यामुळे कुठल्याही भीती किंवा आमिषाला बळी न पडता आपल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एसट यांनी आज ०६-अकोला लोकसभा मतदार संघ अंतर्गत ३३ -रिसोड विधानसभा मतदारसंघातील रिसोड तालुक्याच्या मौजे रिठद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मतदार जनजागृती मेळाव्यास मार्गदर्शन करताना केले.
या मेळाव्यास रिसोड उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, गटशिक्षणाधिकारी श्री. कोकाटे, मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान खंडूजी बोरकर, नोडल अधिकारी श्रीन भिस्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती भुवनेश्वर म्हणाल्या की निवडणूक हे देशाच्या लोकशाहीला बळकट करण्याचे प्रभावी माध्यम असून आपल्या लोकशाहीच्या सक्षमीकरणास महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पल्या मताधिकार्याचे वापर करावे. आपल्या मतदारसंघाची महिलांची मतदान टक्केवारी ही इतर जिल्ह्यांपेक्षा अतिशय कमी आहे म्हणून आपण या मतदानात मागील निवडणुकीपेक्षा किमान १०% महिला मतदारांची टक्केवारी वाढ होणे अपेक्षित असून महिला मतदारांनी आपला हक्क आवश्य बजावा असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या. या मतदार जनजागृती मेळाव्याप्रसंगी महिला मतदारांनी आणि जिल्हा परिषद शाळा कर १ व २ तसेच श्री.शिवाजी महाविद्यालय व श्री .जिजाऊ विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदार जनजागृती पर संदेश देण्याच्या उद्देशाने सकाळी गावातून प्रभात फेरी काढली. "आम्ही आहोत महिला मतदार मतदानाचा हक्क अवश्य बजावणार"या घोषवाक्यातून या मुलींनी व महिलांनी आपले मानस गावकऱ्यांपुढे दर्शविले.विद्यार्थिनींचे जिल्हा परिषद शाळा मतदान प्रोत्साहन पर शुभेच्छा पत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले विशेष म्हणजे मुलींनी आपल्या आईंना हे पत्र सुपूर्द केले. यावेळी बोरकर यांचे उत्कृष्ट बी एल ओ म्हणून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कुमारी प्रांजली अंबाटे या विद्यार्थिनीने मतदान जनजागृतीपर मनोगत व्यक्त केले. या उत्कृष्ट मनोगताचे जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.
या मेळाव्यास महिला बचत गट अंगणवाडी सेविका आशा वर्कर शाळेतील शिक्षिका विद्यार्थिनी व त्यांच्या माता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आरू यांनी केले इंगळे यांनी प्रास्ताविक केले तर स्वीपचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी बद्रीनारायण कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Response to "महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"
Post a Comment