-->

जिल्हाधिकारी कार्यालय येथे   महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे 

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण


वाशिम,दि.०१मे  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी मोहन व्यवहारे, तहसिलदार निलेश पळसकर,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, विधी अधिकारी महेश महामुने, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, अनिल घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहीद जवानांच्या विरपत्नी व माता-पिता , स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.


           

0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article