-->

प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक येथे संशयित क्षयरुग्णांची तपासणी  शिबिर उत्साहात

प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक येथे संशयित क्षयरुग्णांची तपासणी शिबिर उत्साहात



 साप्ताहिक सागर आदित्य 

प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक येथे संशयित क्षयरुग्णांची तपासणी  शिबिर उत्साहात


वाशिम, रिसोड तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक येथे संशयित क्षयरुग्णांची तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी फिरते डिजिटल एक्स रे वाहनाद्वारे एक्स रे काढण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ श्रीमती पाटील  , वैद्यकिय अधिकारी डॉ सतिश परभणकर , डॉ अनिल रुईकर यांचे मार्गदर्शनाखाली संशयीत क्षयरुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली. वैज्ञानिक अधिकारी  वैभव रोडे यांनी ६३ संशयीत क्षयरुग्णांची क्ष-किरण तपासणीचे काम केले. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामहरी बेले, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर रवि कावरे, आरोग्य सहाय्यक नारायण काळे, आरोग्य सेवक उमेश वाघ, सुभाष बाजड,उपचार पर्यवेक्षक प्रमोद बावणे , गटप्रवर्तक माधुरी देशमुख, रंजना गारडे, वाहन चालक राजु झनक, गणेश राऊत, परीचर आजीनाथ पालोदे व  आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.यावेळी ५५ संशयीतांचे स्पुटम गोळा करण्यात आले. श्रीमती गोरे (लिंक वर्कर) यांनी २५ व्यक्तींची HIV तपासणी केली.


 जागतिक सिकलसेल दिन साजरा

 करण्यात आला यावेळी कार्यक्षेत्रात १५९ व्यक्तींची सिकलसेल तपासणी करण्यात आली.सर्व उपस्थितांना क्षयरोग, डेंग्यू, एड्स, सिकलसेल बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.शिबीराचे नियोजन आरोग्य निरीक्षक रामदास गवई  यांनी केले.

0 Response to "प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक येथे संशयित क्षयरुग्णांची तपासणी शिबिर उत्साहात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article