मा.सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांकरिता दिनांक २९ जूलै ते ३ ऑगस्ट २०२४ दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
मा.सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांकरिता दिनांक २९ जूलै ते ३ ऑगस्ट २०२४ दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन
वाशिम, भारताचे मा.सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांकरीता दिनांक २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या
कालावधीत विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष लोक अदालत मोहिमेचा सर्व वकील आणि पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन
करण्यात येत आहे. पक्षकार त्यांच्या विवादांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी
प्रत्यक्ष किंवा आभासी व्यासपीठ (ऑनलाईन प्लॅटफॉर्म) माध्यमाव्दारे दोन्ही प्रकारे हजर राहु शकतात.
*विशेष लोक अदालतचे फायदे*
● जलद तडजोड आणि विवादांचे निराकरण
• अंतिम आणि कार्यान्वित निर्णय
• विवादांचे किफायतशीर निराकरण
• कोर्ट फीचा परतावा
जवळच्या राज्य/जिल्हा/तालुका विधि सेवा प्राधिकरणाशी देखील
संपर्क साधू शकता.
https://www.sci.gov.in/ या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
संपर्काची माहिती :
खोली क्रमांक १२७, ब्लॉक बी, पहिला मजला, अतिरिक्त इमारत संकुल,
भारताचे सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली-११०००१
फोन : +९१-११-२३११५६५६
ईमेल: special.lokadalat@sci.nic.in
-: अधिक माहितीसाठी संपर्क :-
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, वाशिम
नविन इमारत, जिल्हा व सत्र न्यायालय
तळमजला कक्ष क्रमांक ०५, वाशिम
फोन क्रमांक : ०७२५२-२३१४५५, मोबाईल क्रमांक : ८५९१९०३९३७
असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिमच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0 Response to "मा.सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांकरिता दिनांक २९ जूलै ते ३ ऑगस्ट २०२४ दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन"
Post a Comment